भारीच! मायक्रोसॉफ्टने आणला सरफेस लॅपटॉप 4; दमदार फीचर्स युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 02:59 PM2021-05-25T14:59:53+5:302021-05-25T15:11:43+5:30

Microsoft Surface Laptop 4 available in India : सरफेस लॅपटॉप 4 मध्ये अप्रतिम लो-लाईट क्षमतेसह बिल्ट-इन एचडी फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि स्टुडिओ मायक्रोफोन रचना आहे.

Microsoft Surface Laptop 4 available in India for commercial, educational customers | भारीच! मायक्रोसॉफ्टने आणला सरफेस लॅपटॉप 4; दमदार फीचर्स युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

भारीच! मायक्रोसॉफ्टने आणला सरफेस लॅपटॉप 4; दमदार फीचर्स युजर्ससाठी ठरणार फायदेशीर

googlenewsNext

नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्ट इंडियातर्फे त्यांचा सरफेस लॅपटॉप 4 अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी आणि अधिकृत रीटेलर्सच्या माध्यमातून व्यावसायिक आणि शैक्षणिक ग्राहकांसाठी उपलब्ध होत असल्याची घोषणा आज करण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या बहुविध पोर्टफोलिओमधील हे नवे उत्पादन नाविन्यपूर्ण आणि अष्टपैलू पर्याय आहे. हायब्रिड पद्धतीने यापुढेही काम करणाऱ्या युजर्सच्या नवनवीन होणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने याची रचना करण्यात आली आहे. युजर्सना कामाचे, निर्मितीचे नवे मार्ग अवलंबण्यासाठी, कार्यालयाच्या बाहेर राहूनही यश गाठण्यासाठी हे लॅपटॉप आहेत.

"भारतात नवा सरफेस लॅपटॉप 4 सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. शिकण्याची आणि कामाची नवी हायब्रिड पद्धत कायम असणार आहे. त्यामुळे या पद्धतीने शिकण्याचे, कामाचे नवे मार्ग शोधण्यासाठी आमच्या उत्पादन आणि पर्यायांची नाविन्यपूर्ण श्रेणी यातून अधिक व्यापक केली गेली आहे. सरफेस लॅपटॉप 4 मधील मायक्रोसॉफ्टच्या नव्या मिटिंग आणि कोलॅबरेशन अ‍ॅक्सेसरीजमुळे वापरकर्त्यांला उत्क्रांत होणाऱ्या हायब्रिड वातावरणात अधिक सक्षम होता येईल. आमच्या या नव्या उत्पादनातून अधिक मोबिलिटी, उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि व्यावसायिक दर्जाची सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतात. त्यामुळे हायब्रिड युगातील स्थित्यंतराच्या या प्रवासात आधुनिक जगातील युजर्सना पाठबळ मिळते," असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजीव सोधी म्हणाले.

सरफेस लॅपटॉप 4 हा मायक्रोसॉफ्ट अनुभवासाठी सर्वाधिक सक्षम केला गेला आहे. यात आधीच्या मॉडेल्सप्रमाणे मूळ लोकप्रिय डिझाइन, डिटेलिंग आणि मटेरिअल तेच ठेवण्यात आले असले तरी यात १३.५ इंची आणि १५ इंची या दोन्ही मॉडेल्समध्ये खास ३:२ पिक्सेलसेन्स हाय-कॉण्ट्रास्ट टचस्क्रीन डिस्प्ले आहे. तसेच यात डॉल्बी® अ‍ॅटमॉस™ ओम्नीसोनिक स्पीकर्स आहेत. यामुळे युजर्सना कुठेही त्यांच्या आवडत्या सिनेमा आणि शोजचा अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव घेता येईल. सरफेस लॅपटॉप 4 मध्ये अप्रतिम लो-लाईट क्षमतेसह बिल्ट-इन एचडी फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि स्टुडिओ मायक्रोफोन रचना आहे. त्यामुळे कामाच्या मिटिंग्सचा अनुभव अप्रतिम ठरतो. त्याचप्रमाणे यातील गेश्चर सपोर्टसह असलेल्या मोठ्या ट्रॅकपॅडमुळे ग्राहकांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या वर्कफ्लोप्रमाणे रचना करता येते.

11th जेन इंटेल® कोअर™ प्रोसेसर किंवा रेडॉन™ ग्राफिक्स मायक्रोसॉफ्ट सरफेस® एडिशन (८ कोअर्स) सह एएमडी रेझेन™ मोबाइल प्रोसेसर्स अशा पर्यायांमध्ये उपलब्ध या डिव्हाइसमुळे कार्यालय, दिवाणखाना, कॉफी शॉपी किंवा वर्ग... तुम्ही कुठेही असलात तरी तुमच्या आधुनिक, मल्टिटास्किंग गरजा सहज पूर्ण होतील. ग्राहकांच्या सुरक्षा गरजा पूर्ण करण्यासाठी सरफेस लॅपटॉप 4 मध्ये एकात्मिक हार्डवेअर, फर्मवेअर, सॉफ्टवेअर आणि आयडेंटिटी प्रोटेक्शन अशी अप्रतिम आणि नाविन्यपूर्ण सुरक्षा पुरवण्यात आली आहे. डेटा जपण्यासाठी आता युजर्सना महत्त्वाची माहिती काढून ठेवता येण्यासारखी हार्ड ड्राइव्हमध्ये साठवता येईल, तसेच क्लाऊड-फर्स्ट डिव्हाइस उपयोजन आणि व्यवस्थापनाद्वारे अधिक सुरक्षा आणि नियंत्रण मिळवता येईल, अगदी फर्मवेअर पातळीपर्यंत. हे डिव्हाइस प्लॅटिनम आणि काळ्या रंगात अलकंटारा किंवा मेटल फिनिशमध्ये उपलब्ध आहे.

उपलब्धता आणि किंमत

भारतातील सर्व ग्राहकांना त्यांचे स्थानिक व्यावसायिक रीसेलर्स, रीटेल स्टोअर्स किंवा अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून सरफेस लॅपटॉप 4 ऑर्डर करता येईल. ग्राहक एसकेयू नऊ महिन्यांपर्यंतच्या मासिक ११,४४४ रुपयांपासून  सुरू होणाऱ्या नो-कॉस्ट ईएमआयला उपलब्ध आहेत.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

 

Web Title: Microsoft Surface Laptop 4 available in India for commercial, educational customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.