स्वदेशी कंपनी Micromax ची जोरदार तयारी; लवकरच दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता 

By सिद्धेश जाधव | Published: June 25, 2021 05:28 PM2021-06-25T17:28:13+5:302021-06-25T17:29:35+5:30

Micromax ln 2B Geekbench: Micromax ln 2 गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे, यात Unisoc T-610 प्रोसेसर मिळू शकतो. 

Micromax ln 2b micromax ln 2c geekbench listings unisoc soc 4gb ram launch soon  | स्वदेशी कंपनी Micromax ची जोरदार तयारी; लवकरच दोन स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता 

हा फोटो प्रतीकात्मक आहे.

googlenewsNext

चिनी कंपन्यांना होणारा विरोध पाहून गेल्यावर्षी भारतीय कंपनी Micromax ने बाजारात पुनरागमन केले होते. कंपनीने IN सीरीजमध्ये Micromax IN Note 1, Micromax IN 1 आणि Micromax IN 1B स्मार्टफोन लाँच केले होते. आता समोर कंपनी या सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. काही दिवसांपूर्वी इन-सीरीजचा फोन Micromax ln 2c सर्टिफिकेशन साइट गीकबेंचवर दिसला होता. आता या सीरीजचा दुसरा नवीन फोन Micromax ln 2b गीकबेंचवर दिसला आहे, हा फोन 23 जून 2021 रोजी गीकबेंचवर लिस्ट करण्यात आला आहे.  

Micromax lN 2B 

Micromax lN 2B स्मार्टफोन गीकबेंच साइटवर लिस्ट झाला आहे, असे Gizmochina च्या रिपोर्टमधून समोर आले आहे. या लिस्टिंगनुसार, माइक्रोमॅक्स इन 2बी अँड्रॉइड 11 सह सादर केला जाईल. तसेच फोनमध्ये Unisoc T-610 प्रोसेसर मिळू शकतो. सोबत Mali-G52 GPU मिळू शकतो. त्याचबरोबर फोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात येईल. इतकेच नव्हे तर गीकबेंच लिस्टिंगमध्ये माइक्रोमॅक्स इन 2बी फोनला सिंगल कोरमध्ये 350 आणि मल्टी-कोरमध्ये 1204 स्कोर मिळालाआहे. 

Micromax IN 2C 

काही दिवसांपूर्वी Micromax IN 2C  देखील गीकबेंचवर दिसला होता. गीकबेंच लिस्टिंगवर Micromax IN 2C स्मार्टफोन Unisoc T-610 चिपसेटसह लिस्ट करण्यात आला आहे. माइक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये  Mali-G52 GPU देण्यात येईल बेंचमार्क लिस्टिंगनुसार यात 4GB RAM आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. Micromax IN 2C स्मार्टफोनला सिंगल कोर टेस्टमध्ये 347 पॉइन्ट स्कोर आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 1,127 पॉइन्ट्स मिळाले आहेत.   

Web Title: Micromax ln 2b micromax ln 2c geekbench listings unisoc soc 4gb ram launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.