शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: एआयची शर्यत: जग घडवणारी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 14:23 IST

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: जगातील अनेक देश एआय तंत्रज्ञानात आघाडी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.

Lokmat AI ची अद्भूत दुनिया: आज संपूर्ण जगात एक नवीन तांत्रिक क्रांती वेगाने घडत आहे. ही क्रांती आहे एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. संगणक आणि यंत्रे स्वतः शिकू शकतात, माहितीचे विश्लेषण करू शकतात आणि निर्णय घेऊ शकतात ही एआयची ताकद आहे. त्यामुळेच जगातील अनेक देश एआय तंत्रज्ञानात आघाडी मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत.

पूर्वी देशांमध्ये अंतराळ संशोधन, अणुशक्ती किंवा औद्योगिक उत्पादन यासाठी स्पर्धा असायची; पण आता एआय हीच नवीन जागतिक शर्यत बनली आहे. अमेरिका, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया आणि युरोपमधील अनेक देश एआय संशोधनावर अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत आहेत.

एआयमुळे बदलणारे क्षेत्र !

आरोग्य क्षेत्र - डॉक्टरांना रोग लवकर ओळखण्यास एआय मदत करत आहे. काही प्रणाली एक्स-रे किंवा स्कॅन पाहून रोगांचे संकेत देऊ शकतात.

शेती क्षेत्र - शेतकऱ्यांना पिकांची स्थिती, हवामानाचा अंदाज आणि कीड नियंत्रण याबाबत एआय मदत करत आहे.

शिक्षण क्षेत्र - विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट शिक्षण प्लॅटफॉर्म तयार होत आहेत. एआय आधारित अॅप विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीनुसार मार्गदर्शन करतात.

स्मार्ट शहरे - वाहतूक नियंत्रण, ऊर्जा व्यवस्थापन आणि सुरक्षेसाठी एआय वापरले जात आहे.

विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी - एआयची ही जागतिक स्पर्धा

विद्यार्थ्यांसाठी नवी दारे उघडत आहे.

नवीन करिअर क्षेत्रे - डेटा सायन्स, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, एआय इंजिनिअरिंग, सायबर सुरक्षा अशा अनेक क्षेत्रांमध्ये संधी.

एआयतील देश!

अमेरिका-तंत्रज्ञानाचे केंद्र : जगातील अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या अमेरिकेत आहेत. या कंपन्या एआय संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. अनेक प्रगत एआय मॉडेल्स, क्लाऊड तंत्रज्ञान आणि डिजिटल साधने अमेरिकेत विकसित झाली आहेत.

चीन-वेगाने पुढे जाणारा देश : चीनने एआयला राष्ट्रीय धोरणाचा भाग बनवले आहे. चेहरा ओळखणारे तंत्रज्ञान, स्मार्ट शहर प्रणाली आणि एआय आधारित उद्योगांमध्ये चीन मोठ्या प्रमाणावर प्रयोग करतो.

भारत-नव्या संधींचा देश! : भारतात एआय क्षेत्रातील स्टार्टअपची संख्या ३ हजारांपेक्षा जास्त झाली आहे.

एआय एवढा महत्त्वाचा का ?

तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दशकांमध्ये जगातील बहुतांश उद्योग आणि सेवा एआयवर आधारित असतील. पीडब्ल्यूसी या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत एआयमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत सुमारे 15 ट्रिलियन डॉलर (अंदाजे 1200 लाख कोटी रुपये) इतकी भर पडू शकते. त्यामुळे प्रत्येक देशाला या क्षेत्रात पुढे राहायचे आहे.

विद्यार्थ्यांनी काय करावे?

तंत्रज्ञानाबद्दल उत्सुकता आणि जिज्ञासा ठेवावी.
संगणक आणि प्रोग्रामिंगची मूलभूत माहिती शिकावी.
एआय साधनांचा जबाबदारीने वापर करावा.
नवीन प्रयोग आणि प्रकल्प करण्याचा प्रयन करावा.
आजचे विद्यार्थी जर एआय तंत्रज्ञान समजून घेतील, तर ते भविष्यातील समाज आणि उद्योग घडवू शकतील.

नवीन कल्पना आणि स्टार्टअप्स

अनेक तरुण एआयच्या मदतीने नवीन स्टार्टअप्स सुरु करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याचीही संधी मिळू शकते.

Moral Story

Artificial Intelligence (Al) is a technology that enables machines and computers to learn from data, recognize patterns and make decisions similar to human intelligence. The countries may compete in Al, but the real winners will be the students who learn and use this technology wisely.

नवीन कौशल्ये शिकण्याची संधी

इंटरनेटवर अनेक मोफत एआय कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थी लहान वयातच तंत्रज्ञानाशी परिचित होतात.

- इंजि. अविनाश जाधव, एआय अँड टेक एज्युकेटर
 

English
हिंदी सारांश
Web Title : Lokmat AI: The Amazing World and Global Race of Artificial Intelligence

Web Summary : AI is revolutionizing fields like healthcare, agriculture, and education. Nations are investing heavily in AI research, creating opportunities for students in data science, robotics, and cybersecurity. India's startup ecosystem is booming, and students should embrace AI to shape the future.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सLokmatलोकमतtechnologyतंत्रज्ञान