शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मस्तच! SMS पाठवून लॉक करा आधार नंबर; असा सुरक्षित ठेवा डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2019 4:53 PM

आधार नंबरशी संबंधित डेटाची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी लक्षात घेऊन यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एक नवं फीचर इंट्रोड्यूस केलं.

नवी दिल्ली - ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तसेच युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक नवनवीन गोष्टी येत असतात. आधार नंबरशी संबंधित डेटाची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी लक्षात घेऊन यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) एक नवं फीचर इंट्रोड्यूस केलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स सहजपणे आपला आधार नंबर लॉक किंवा अनलॉक करू शकतात. 

लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी यूआयडीएआयने हे फीचर आणलं आहे. आधार नंबरच्या मदतीने करण्यात येणाऱ्या चुकीच्या व्यवहारांना यामुळे आळा बसणार आहे. केवळ एक मेसेज पाठवून आधार नंबर युजर्सना लॉक आणि अनलॉक करता येणार आहे. मात्र मेसेज पाठवणार आहोत तो मोबाईल नंबर आधारसोबत रजिस्टर असणं गरजेचं आहे. 

आधार नंबर लॉक करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

- आपल्या मोबाईल नंबरवरून 1947 वर एक मेसेज पाठवा. त्यानंतर युजर्सना एक वन टाईप पासवर्ड मिळेल.

- GETOTP आधार नंबरचे शेवटचे चार अंक अशा फॉरमॅटमध्ये मेसेज करा. उदाहरणार्थ  आधार नंबर 6758 6752 3487 असेल तर मेसेजमध्ये GETOTP3487 असं लिहून 1947 वर पाठवा. 

- 6 अंकांचा ओटीपी मिळाल्यानंतर LOCKUID पुढे आधार नंबरचे शेवटचे चार अंक आणि त्यानंतर ओटीपी अशा फॉरमॅटमध्ये मेसेज करा म्हणजे आधार नंबर लॉक होईल. 

आधार कार्डवरील फोटो बदलायचाय? " src="https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/686x514/adhar-card-photo_201905243234.jpg"/>

आधार नंबर अनलॉक करण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो

- GETOTP नंतर आधार नंबरचे शेवटचे सहा अंक लिहून मेसेज करा. त्यानंतर फोनवर एक ओटीपी पाठवला जाईल. 

- ओटीपी मिळाल्यानंतर UNLOCKUID व्हर्चुअल ID चे शेवटचे 6 अंक आणि ओटीपी अशा फॉरमॅटमध्ये 1947 वर पाठवा. त्यानंतर आधार नंबर अनलॉक होईल. 

आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळेच त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. अनेकदा नाव, पत्ता, फोन नंबर किंवा फोटोबाबत चुका असतात. त्या बदलता येतात. तसेच आधार कार्डवरील फोटो देखील काही वेळा थोडा काळा असतो. त्यामुळे तो फोटो बदलायचा असल्यास काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

फोटो बदलण्याची पद्धत 

- जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जा. 

- आधार अपडेट/करेक्शन फॉर्म घेऊन त्यामध्ये विचारण्यात आलेली माहिती नीट भरा. 

- नोंदणी केंद्रवरील कर्मचाऱ्यांकडून बोटांचे ठसे आणि डोळ्यांचं स्कॅनिंग केलं जाईल आणि नवा फोटो काढला जाईल. 

- आधार अपडेट/करेक्शन फी (जवळपास 25 रुपये + जीएसटी) जमा करा. 

- यूआरएन सोबत मिळणारी स्लीप जपून ठेवा. 

- URN सोबत एक स्लिप देण्यात येईल. ती नीट जपून ठेवा.  

- URN च्या मदतीने तुम्ही तुमच्या आधार कार्ड अपडेटचं स्टेटस चेक करू शकता.

- दुरुस्ती केलेले आधार कार्ड, त्यावर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवले जाते किंवा अधिकृत वेबसाइटवरून डाऊनलोड करता येते. 

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल