LG ने भारतात लॉन्च केला Ai Smart TV; किंमत ऐकून चक्रावून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:56 IST2025-07-15T11:55:45+5:302025-07-15T11:56:39+5:30
LG ने OLED evo आणि QNED evo सीरिज आणली आहे.

LG ने भारतात लॉन्च केला Ai Smart TV; किंमत ऐकून चक्रावून जाल...
जगप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG ने भारतीय बाजारात आपला नवीन Ai स्मार्ट टीव्ही लाॉन्च केला आहे. कंपनीने याचे ४३ इंच ते ९७ इंच...असे वेगवेगळे मॉडेल्स आणले आहेत. विशेष म्हणजे, याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. हे मॉडेल ९७ इंच आकारात येतो. कंपनीने OLED evo आणि QNED evo सीरिज आणली आहे. या सीरिजमध्ये तुम्हाला अधिकाधिक प्रीमियम फिचर्स मिळतात. यात खास Ai फिचर आहेत, जे या स्मार्ट टीव्हीला इतरांपेक्षा वेगळे बनवतात.
फास्ट प्रोसेसर...
या टीव्हीची खासियत म्हणजे, युजर कसा संवाद साधतो, याचे आकलन करुन टीव्ही तशाच प्रकारचा कंटेट सुचवतो. दोन्ही व्हेरिएंटमध्ये कंपनीने Ai एन्हांसमेंट, प्रगत डिस्प्ले तंत्रज्ञान आणि अपडेटेड वेबओएस दिले आहे. कंपनीने २०२५ च्या OLED evo आणि QNED evo TV मध्ये Alpha AI Gen 2 प्रोसेसर दिला आहे. यामुळे तुम्हाला चांगले कस्टमायझेशन आणि स्मार्ट कंट्रोल्स मिळतील. कंपनीने AI मॅजिक रिमोटमध्ये एक वेगळे AI बटण दिले आहे, जे व्हॉइस कंट्रोल आणि नेव्हिगेशनसाठी वापरले जाऊ शकते.
स्मार्ट Ai फिचर्स
हा स्मार टीव्ही, युजरला त्याच्या आवडीचा कंटेट दाखवेल आणि कीवर्डही सुचवेल. यातील Ai फिचर लार्ज लँग्वेज मॉडेलवर तयार केले आहे. टीव्हीमध्ये दिलेला AI चॅटबॉट रिअल टाइममध्ये समस्या शोधतो आणि त्याचे निराकरण करतो. या टीव्हीमध्ये एक नवीन webOS आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक नवीन डिझाइन केलेला होम स्क्रीन मिळेल, जे मल्टी युजरला सपोर्ट करेल. शिवाय, यात इंटीग्रेटेड Apple AirPlay आणि Google Cast आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनचा कंटेट टीव्हीवर शेअर करू शकता.
किंमत किती..?
कंपनीने QNED AI टीव्ही ७४,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला आहे. या टीव्हीमध्ये ४३-इंच ते ७५-इंच स्क्रीन साईजचा पर्याय आहे. तर, QNED evo सीरिज (QNED8GA / XA) १,१९,९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल. तुम्ही OLED evo ची C5 सीरिज १,४९,९९० रुपयांना, G5 सीरिज २,६७,९९० रुपयांना आणि G5 अल्ट्रा-लार्ज टीव्ही सीरिज २४,९९,९९० रुपयांना खरेदी करू शकता. ही किंमत ९७-इंच स्मार्ट टीव्हीसाठी आहे.