Jio ची धमाकेदार ऑफर! 15 दिवस मिळेल Free Internet, बेनिफिट्स पाहून म्हणाल फुल्ल पैसा वसूल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 15:17 IST2022-08-12T14:18:15+5:302022-08-12T15:17:33+5:30
jio fiber independence day offer : स्वातंत्र्याचा (Independence day) आनंद साजरा करण्यासाठी रिलायन्स जिओने (Reliance Jio) 3 अनोख्या उपक्रमांसह जिओ इंडिपेंडन्स-डे ऑफरची घोषणा केली आहे.

Jio ची धमाकेदार ऑफर! 15 दिवस मिळेल Free Internet, बेनिफिट्स पाहून म्हणाल फुल्ल पैसा वसूल!
नवी दिल्ली : यंदा संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, स्वातंत्र्याचा (Independence day) आनंद साजरा करण्यासाठी रिलायन्स जिओने (Reliance Jio) 3 अनोख्या उपक्रमांसह जिओ इंडिपेंडन्स-डे ऑफरची घोषणा केली आहे. जी भारतीयांसाठी जिओ डिजिटल लाइफचे रोमांचक असे नवीन बेनिफिट्स घेऊन आली आहे.
या उपक्रमांमध्ये 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर 3000 रुपयांच्या बेनिफिट्ससह 'जिओ फ्रीडम ऑफर', 750 रुपयांचा विशेष '90 अनलिमिटेड प्लॅन' आणि 'हर घर तिरंगा, हर घर जिओ फायबर' ऑफर्सचा समावेश आहे. जे 15 दिवसांच्या बेनिफिट्सह येतात.
जिओ फायबर इंडिपेंडन्स-डे ऑफर!
'हर घर तिरंगा, हर घर जिओ फायबर' ऑफर सर्व नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे, जे नवीन जिओ फायबर (JioFiber) कनेक्शन खरेदी करणार आहेत. त्यांना 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान जिओ फायबर पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅन घ्यावा लागेल. ही ऑफर फक्त त्या लोकांसाठी आहे, जे नवीन प्लॅन घेतील. युजर्सला अॅक्टिव्हेशनच्यावेळी सिलेक्टेड प्लॅनवर 15 दिवसांचा अतिरिक्त लाभ मिळेल. या ऑफर जाणून घेऊया...
काय आहे ऑफर आणि कशी मिळवायची?
- जर तुम्हाला ही ऑफर पाहिजे असेल तर तुम्ही जिओचे नवीन ग्राहक असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला पोस्टपेड एंटरटेनमेंट बोनान्झा प्लॅन घ्यावा लागेल. ही ऑफर फक्त 499 रुपये, 599 रुपये, 799 रुपये आणि 899 रुपयांच्या प्लॅनसाठी लागू आहे.
- जर तुम्हाला 15 दिवसांसाठी फ्री बेनिफिट्स घ्यायचे असेल तर तुम्हाला 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान हा प्लॅन निवडावा लागेल. हा प्लॅन 19 ऑगस्टपर्यंत अॅक्टिव्हेट होईल. पण ऑफर तुम्ही 6 महिने किंवा वर्षभरासाठी घेतली असेल तरच मिळेल.