Jio चा गेमचेंजर प्लॅन, 198 रुपयांत दररोज मिळेल 2GB डेटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 11:57 IST2025-01-05T11:56:50+5:302025-01-05T11:57:25+5:30

कोणत्या कंपनीचा 2 जीबी डेली डेटा असलेला सर्वात स्वस्त प्लान आहे? याबाबत जाणून घ्या...

jio 198 plan offers cheapest 2gb daily data plan check benefits and validity | Jio चा गेमचेंजर प्लॅन, 198 रुपयांत दररोज मिळेल 2GB डेटा

Jio चा गेमचेंजर प्लॅन, 198 रुपयांत दररोज मिळेल 2GB डेटा

रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि ​​व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea - Vi) या तिन्ही कंपन्यांकडे प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी अनेक शानदार रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. या तीनपैकी कोणत्या कंपनीचा 2 जीबी डेली डेटा असलेला सर्वात स्वस्त प्लान आहे? याबाबत जाणून घ्या...

Jio 198 Plan Details
रिलायन्स जिओच्या 198 रुपयांच्या प्लॅनसह, कंपनी तुम्हाला दररोज 2 जीबी हायस्पीड डेटा, लोकल आणि एसटीडी नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जाते.

Jio 198 Plan Validity
रिलायन्स जिओच्या या परवडणाऱ्या प्लॅनच्या व्हॅलिडिटीबद्दल सांगायचे झाले तर, दररोज 2 जीबी डेटासह, तुम्हाला हा प्लॅनमध्ये 14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. 14 दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज 2 जीबी डेटा यानुसार प्लॅनमध्ये एकूण 28 जीबी डेटा मिळेल. एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री अॅक्सेस मिळते.

Airtel 379 Plan Details
एअरटेलचा डेली 2 जीबी डेटा असलेला सर्वात स्वस्त प्लॅन 379 रुपयांचा आहे, या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा व्यतिरिक्त, फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 1 महिन्याची आहे. एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा, स्पॅम अलर्ट, तीन महिन्यांसाठी अपोलो सर्कल मेंबरशिप आणि फ्री हेलो ट्यूनचा लाभ मिळतो.

Vi 365 Plan Details
व्होडाफोन-आयडिया कंपनीकडे 2 जीबी दैनंदिन डेटा असलेले अनेक प्लॅन आहेत. मात्र, सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत 365 रुपये आहे. या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस आणि 365 रुपयांमध्ये फ्री कॉलिंगशिवाय दररोज 2 जीबी डेटाचा लाभ मिळतो. 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह या प्लॅनमध्ये हाफ डे अनलिमिटेड डेटा, वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मध्यरात्री 12 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मिळू शकते.

Web Title: jio 198 plan offers cheapest 2gb daily data plan check benefits and validity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.