इंटरनेटशिवाय करता येणरा चॅटिंग; जॅक डोर्सीने आणले नवीन ‘Bitchat’ App, पाहा फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:04 IST2025-07-08T18:03:08+5:302025-07-08T18:04:43+5:30
Jack Dorsey : ट्विटर आणि ब्लॉक सारख्या कंपन्यांचे संस्थापक जॅक डोर्सी पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या जगात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत.

इंटरनेटशिवाय करता येणरा चॅटिंग; जॅक डोर्सीने आणले नवीन ‘Bitchat’ App, पाहा फिचर्स...
Jack Dorsey : ट्विटर आणि ब्लॉक सारख्या कंपन्यांचे संस्थापक जॅक डोर्सी पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या जगात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी त्यांनी एक असे अॅप आणले आहे, जे इंटरनेटशिवाय, मोबाईल नंबरशिवाय आणि ईमेलशिवाय चॅटिंग करण्यास सक्षम आहे. या अॅपचे नाव Bitchat आहे. हे अॅप एक डिसेंट्रलाइज्ड मेसेजिंग सिस्टीम आहे, जे ब्लूटूथ लो एनर्जी (BLE) तंत्रज्ञानावर काम करते.
काय आहे बिटचॅट ?
बिटचॅट हे एक मोबाइल मेसेजिंग अॅप आहे, जे इंटरनेट किंवा मोबाईल नेटवर्कशिवाय काम करेल. हे पीअर-टू-पीअर मेसेजिंगला सपोर्ट करते. याचा अर्थ असा की, एक मोबाइल थेट दुसऱ्या मोबाईलशी कनेक्ट होतो आणि मेसेज पाठवतो. हे अॅप जॅक डोर्सीचा वीकेंड प्रोजेक्ट मानले जातोय, परंतु या तंत्रज्ञानाने आणि संकल्पनेने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
बिटचॅट कसे काम करते?
बिटचॅट ब्लूटूथ मेश नेटवर्कद्वारे डिव्हाइस-टू-डिव्हाइस कनेक्शन तयार करते. हे नेटवर्क 300 मीटरपेक्षा जास्त अंतरावर काम करते.
मेसेज multi-hop सिस्टमद्वारे पाठवले जातात. म्हणजेच, जर दोन डिव्हाइसेस दूर असतील तर मेसेज इतर मोबाइल डिव्हाइसद्वारे फॉरवर्ड केला जातो.
मेसेज युजरच्या डिव्हाइसवर तात्पुरत्या मेमरीमध्ये सेव्ह केला जातो. जर रिसिव्हर ऑफलाइन असेल, तर मेसेज नंतर वितरित केला जातो.
बिटचॅटचे सुरक्षा धोरण काय आहे?
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन: Curve25519 + AES-GCM अल्गोरिथमद्वारे डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो.
फोन नंबर किंवा ईमेल आवश्यक नाही: यामध्ये मोबाइल नंबर किंवा ईमेल आवश्यक नाही, म्हणजेच ते पूर्णपणे खाजगी आहे.
सर्व्हर नाही, केंद्रीय नियंत्रण नाही: कोणताही केंद्रीय सर्व्हर नाही, म्हणून अॅप सेन्सॉरशिप-मुक्त आहे आणि नेटवर्क ब्लॉकिंगपासून पूर्णपणे सुरक्षित आहे.
सध्या बिटचॅट कुठे उपलब्ध आहे?
सध्या, हे अॅप Apple TestFlight द्वारे iOS वापरकर्त्यांसाठी बीटा व्हेर्जनमध्ये लॉन्च केले गेले आहे. बीटा अॅक्सेसनंतर ते येत्या काळात अँड्रॉइड आणि इतर प्लॅटफॉर्मवर देखील आणले जाऊ शकते.