स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:14 IST2025-11-19T17:13:56+5:302025-11-19T17:14:44+5:30
आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण अनेकदा असं होतं की फोनची बॅटरी खूप लवकर कमी होते आणि आपल्याला वारंवार चार्जर शोधावा लागतो.

स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
Smartphone Battery Tips: जर तुमचा फोनही विनाकारण लवकर डिस्चार्ज होत असेल, तर काही सोप्या सेटिंग्स बदलून तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी लाईफ खूप वाढवू शकता. तुमचा मोबाईल दुप्पट वेळ चालेल अशा '५' स्मार्ट सेटिंग्स जाणून घेऊया…
स्क्रीन ब्राइटनेस 'ऑटो' वर सेट करा
फोनची स्क्रीन बॅटरीची सर्वात मोठी शत्रू असते. जर, तुम्ही ब्राइटनेस नेहमी फुल ठेवला, तर बॅटरी खूप लवकर संपेल. त्यामुळे ब्राइटनेस नेहमी 'Auto' किंवा 'Adaptive Brightness'वर सेट करा. यामुळे फोन प्रकाशाच्या गरजेनुसार ब्राइटनेस आपोआप ॲडजस्ट करतो आणि बॅटरी वाचते.
बॅटरी सेव्हर मोड नेहमी ऑन ठेवा
Android आणि iPhone दोघांमध्येही बॅटरी सेव्हर मोड उपलब्ध आहे. हा मोड ऑन केल्यास फोन बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी, लोकेशन आणि नको असलेले ॲप्स नियंत्रित करतो. यामुळे बॅटरीचा वापर खूप कमी होतो आणि तुमचा फोन जास्त वेळ टिकतो.
अनावश्यक ॲप्सची बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी बंद करा
अनेक ॲप्स वापरत नसतानाही बॅकग्राउंडमध्ये डेटा आणि बॅटरी दोन्ही वापरत राहतात. सेटिंग्समधील Battery Usageमध्ये जाऊन कोणते ॲप सर्वात जास्त बॅटरी वापरत आहे हे तपासा आणि त्यांची बॅकग्राउंड ॲक्टिव्हिटी 'Restrict' करा. यामुळे फोन जलद चालेल आणि बॅटरीही वाचेल.
Always-On Display आणि कंपन बंद करा
तुमच्या फोनची स्क्रीन AMOLED प्रकारची असल्यास 'Always-On Display' हे फीचर खूप बॅटरी वापरते. हे फीचर बंद करा. त्याचबरोबर कीबोर्ड किंवा नोटिफिकेशनचे Vibration देखील बॅटरी संपवते. हे बंद केल्यास बॅटरी लाईफमध्ये लगेच फरक दिसेल.
नेटवर्क आणि लोकेशन सेटिंग्स ऑप्टिमाइझ करा
नेटवर्क सिग्नल कमकुवत असलेल्या ठिकाणी फोन सतत सिग्नल शोधत राहतो, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. अशा वेळी 'Airplane Mode' ऑन करा. याशिवाय लोकेशन सेटिंग सतत 'Always On' ठेवल्यानेही बॅटरी खर्च होते. अशावेळी ही सेटिंग्स Battery Saving Modeमध्ये सेट करा.