या iPhone साठी काहीच विकावं लागणार नाही; किफायतशीर iPhone SE 3 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

By सिद्धेश जाधव | Published: January 15, 2022 07:36 PM2022-01-15T19:36:04+5:302022-01-15T19:36:51+5:30

iPhone SE 3 चे रेंडर्स लीक झाले आहेत, त्यामुळे या आगामी स्वस्त अ‍ॅप्पलच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.  

iPhone SE 3 renders leak design and hardware details   | या iPhone साठी काहीच विकावं लागणार नाही; किफायतशीर iPhone SE 3 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

या iPhone साठी काहीच विकावं लागणार नाही; किफायतशीर iPhone SE 3 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

Next

iPhone SE 3 ची वाट फक्त अ‍ॅप्पल युजर्स नव्हे तर अँड्रॉइड युजर्स देखील बघत आहेत. हा कंपनीचा सर्वात किफायतशीर स्मार्टफोन असेल. तसेच यात 5G सपोर्ट मिळणार असल्याचं समजल्यापासून अनेकांची उत्सुकता वाढली आहे. आता या आयफोनचे CAD renders समोर आले आहेत, त्यातून या डिवाइसच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.  

iPhone SE 3 ची लीक डिजाईन 

TenTechReview च्या रिपोर्टमधून टिपस्टर @xleaks7 ने शेयर केलेली आगामी iPhone SE 3 ची डिजाइन समोर आली आहे. या रेंडर्सनुसार या फोनचा समोरचा भाग बदलण्यात येईल परंतु बॅक पॅनल जुन्या मॉडेल्स सारखाच असेल. iPhone SE 3 मध्ये एक सिंगल रियर कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश देण्यात येईल. या फोनचा आकार 38.4 x 67.3 x 7.3 mm इतका असेल, जो जुन्या मॉडेल सारखा आहे.  

या फोनच्या फ्रंटला 5.69 इंचाची एक मोठी स्क्रीन मिळू शकते. यावेळी नॉच मिळेल ज्यात फ्रंट कॅमेरा, Face ID असे फिचर मिळेल. उजवीकडे एक पॉवर बटन आणि सिम ट्रे असेल तर डावीकडे पॉवर बटन आणि साइलेंट मोड स्विच मिळेल. अशी डिजाईन iPhone XR मध्ये दिसली होती. आगामी iPhone SE 3 मध्ये A14 बायोनिक किंवा A15 बायोनिक चिपसेट मिळेल, जो 5G नेटवर्क कनेक्टिविटीसह येईल. 

हे देखील वाचा:

नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

खिशाला परवडणाऱ्या किंमतीती Vivo चे दोन ढासू स्मार्टफोन लाँच; 5000mAh ची बॅटरी चालेल दिवसभर

Web Title: iPhone SE 3 renders leak design and hardware details  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.