आयफोन स्वस्त होणार, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 03:33 PM2019-01-30T15:33:34+5:302019-01-30T16:20:05+5:30

अ‍ॅपलने चीनमध्ये थर्ड पार्टी वितरकांसाठी आयफोनच्या किंमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच भारतातही आयफोनच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.

iphone may soon get cheaper in india as apple revenue fall | आयफोन स्वस्त होणार, 'हे' आहे कारण

आयफोन स्वस्त होणार, 'हे' आहे कारण

googlenewsNext
ठळक मुद्देभारतातही आयफोनच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहेकंपनीच्या महसुलात घट झाल्याने विक्री वाढवण्यासाठी भारतात आयफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकन डॉलरची किंमत जगातील इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत खुपच अधिक असल्याने त्याचा परिणाम आयफोनच्या किंमती वाढण्यावर होतो.

नवी दिल्ली - अ‍ॅपलने चीनमध्ये थर्ड पार्टी वितरकांसाठी आयफोनच्या किंमती कमी करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच भारतातही आयफोनच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. आयफोनच्या किंमती महाग असतात. कंपनीच्या महसुलात घट झाल्याने विक्री वाढवण्यासाठी भारतात आयफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलचे सीईओ टीम कूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आयफोनच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. यामागे अनेक कारणं असल्याचे सांगितले आहे. 

ग्राहक आपल्या जुन्या आयफोनचा वापर बऱ्याच काळापासून करत असल्याचं कूक म्हणाले. याचा संबंध मायक्रोइकॉनॉमी फॅक्टरशी जोडता येईल. त्याचबरोबर आयफोनच्या विक्रीवर परिणाम होण्याचे आणखी एक कारण सांगितलं. अमेरिकन डॉलरची किंमत जगातील इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत खुपच अधिक असल्याने त्याचा परिणाम आयफोनच्या किंमती वाढण्यावर होत आहे. आयफोनची बॅटरी बदलण्याची पद्धत हे देखील एक कारण आहे. आयफोनची बॅटरी ही दिर्घकाळ टिकणारी आणि सहज बदलता येणारी असल्याने आमचे लाखो ग्राहक याचा फायदा घेत आहेत.

अ‍ॅपलने गेल्या वर्षी लाँच केलेले नवीन आयफोन हे 84 हजार ते तब्बल दीड लाख रुपये एवढ्या किंमतीचे आहेत. यामुळे भारतीयांचा एवढी रक्कम मोजण्यापेक्षा जुनाच वापरात असलेला फोन वापरण्याकडे कल आहे. यामुळे आयफोनच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाली आहे. या ग्राहकांना नवीन आयफोन घेण्यासाठी या किंमती काही प्रमाणात कमी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Web Title: iphone may soon get cheaper in india as apple revenue fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.