पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 03:29 PM2024-05-27T15:29:11+5:302024-05-27T15:30:09+5:30

Papua New Guinea landslide : पापुआ न्यू गिनी देशातील काओकलाम गावात झोपेत असलेल्या लोकांवर काळाने घाला घातला.

Papua New Guinea landslide: Landslides devastate Papua New Guinea; 2000 people were buried alive | पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...

पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...

Papua New Guinea landslide : पापुआ न्यू गिनी देशात झालेल्या भूस्खलनामुळे हाहाकार माजला आहे. पापुआ न्यू गिनीच्या राजधानी मोरेस्बीपासून 600 किमी अंतरावर असलेल्या काओकलाम गावात दोन दिवसांपूर्वी सकाळी 3 वाजता भूस्खलन झाले होते. या भूस्खलनात मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडली गेली. आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. यापूर्वी ही संख्या 670 असल्याचे सांगितले जात होते, पण त्यात सातत्याने वाढ होत आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

भूस्खलनाचे प्रमाण आता वाढत आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेथील नॅशनल डिझास्टर सेंटरचे कार्यवाहक संचालक लुसेट लासो माना यांनी संयुक्त राष्ट्राला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, भूस्खलनामुळे 2,000 हून अधिक लोक जिवंत गाडले गेले असून, अनेक इमारती आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भूस्खलनाचा देशाच्या विकासावर मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, भूस्खलन संथ गतीने होत असल्याने परिस्थिती अस्थिर बनली आहे. दरड कोसळल्यामुळे अनेक भागांना जोडणारे रस्तेही बंद झाले आहेत. 

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना शोधणे आव्हानात्मक 
सिडनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सिव्हिल इंजिनीअरिंगचे सहयोगी प्राध्यापक पियरे रोगनन म्हणाले की, भूस्खलनानंतर लोकांना शोधणे खूप मोठे आव्हान आहे. भूस्खलनामुळे कोसळलेल्या इमारती आणि लोक अनेक मीटर खाली दबले गेले असतील. दरम्यान, भूस्खलन कशामुळे झाले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतू ॲडलेड विद्यापीठातील भूगर्भशास्त्राचे प्राध्यापक ॲलन कॉलिन्स यांनी सांगितले की, हा अतिशय पावसाळी भाग होता, त्यामुळे येथे असे घडले असावे. 

Web Title: Papua New Guinea landslide: Landslides devastate Papua New Guinea; 2000 people were buried alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.