सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण

By संदीप शिंदे | Published: May 27, 2024 02:07 PM2024-05-27T14:07:19+5:302024-05-27T14:11:54+5:30

दोघा भावांनाही आयआयटीचे शिक्षण घेण्याची इच्छा असून, ते तयारीला लागले आहेत.

Same to same! The success of Laturs twin brothers Sarthak and Swapnil Saudagar also matches; 100 percent marks obtained in class 10th | सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण

सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण

लातूर : शहरातील रहिवासी असलेल्या सार्थक व स्वप्नील सौदागर चव्हाण या जुळ्या भावंडांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेतही आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, त्यांनी गुणही जुळेच मिळविले आहेत. दोघा भावडांना १०० टक्के गुण मिळाले आहे.

लातूर शहरातील ज्ञानप्रकाश बालविकास केंद्रात इयत्ता दहावीच्या वर्गातील सार्थक सौदागर चव्हाण व स्वप्नील सौदागर चव्हाण या जुळ्या भावडांनी १०० टक्के गुण मिळविले आहेत. सार्थक याने बुद्धीबळ तर स्वप्नील याने संगीत कलाप्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे त्यांना विशेष गुणांचा लाभ मिळाला. यामध्ये सार्थकला ९ आणि स्वप्नीलला १० अतिरिक्त गुण मिळाले असून, दोघांनीही दहावीत १०० टक्के गुण मिळविले आहेत. 

दोघा भावांनाही आयआयटीचे शिक्षण घेण्याची इच्छा असून, ते तयारीला लागले आहेत. वडील माजी मुख्याध्यापक तर आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या या जुळ्या भावडांचे यशही जुळंच असल्याचे त्यांचे कौतूक होत आहे.

Web Title: Same to same! The success of Laturs twin brothers Sarthak and Swapnil Saudagar also matches; 100 percent marks obtained in class 10th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.