राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 02:45 PM2024-05-27T14:45:48+5:302024-05-27T14:46:20+5:30

Amit Shah Kushinagar Rally: "भाजप आणि एनडीएचा विजय निश्चित आहे. 4 जूनला दुपारी विरोधक पराभवाचे खापर EVM वर फोडतील.

How many seats will the party of Rahul Gandhi and Akhilesh Yadav get? Amit Shah predicted | राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी

राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी

Amit Shah Kushinagar Rally: लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. तसेच, या दोन्ही पक्षांना निवडणुकीत किती जागा मिळणार, हेदेखील सांगितले. 

अमित शाह म्हणाले की, "लोकसभेचे सहा टप्प्यातील मतदान संपले आहे. माझ्याकडे 5 टप्प्याची आकडेवारी आहे. नरेंद्र मोदींनी 5 टप्प्यातच 310 जागांचा टप्पा पार केला आहे. सातवा टप्पा होणार आहे, ज्यामध्ये 400 पार करायचे आहे. राहुल गांधींचा पक्ष 40 चा आकडाही पार करू शकणार नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला तर यूपीमध्ये 4 जागादेखील मिळणे अवघड आहे," असा दावा अमित शाहंनी केला.

EVM वर खापर फोडणार- शहा
शाह पुढे म्हणाले, "भाजप आणि एनडीएचा 4 जूनला विजय निश्चित आहे. 4 जूनला दुपारी राहुलबाबाचे लोक पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएममुळे आमचा पराभव झाल्याचे म्हणतील. पराभवाचे खापरही खरगे साहेबांवरच पडेल. विरोधक सरकार आल्यावर मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा करत आहेत. ते चुकून जिंकले तरी मागास, अतिमागास आणि दलितांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देतील. कर्नाटक आणि हैदराबादमध्ये त्यांनी जे काही केले, तेच त्यांनी बंगालमध्ये केले, परंतु तेथे (बंगाल) उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली. मुस्लिम आरक्षण संविधानानुसार नाही. आपल्या व्होट बँकेला खूश करण्यासाठी ते मुस्लिम आरक्षणाचे आश्वासन देत आहेत. त्याचे थेट परिणाम मागासवर्गीयांना भोगावे लागतील." 

Web Title: How many seats will the party of Rahul Gandhi and Akhilesh Yadav get? Amit Shah predicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.