हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 03:20 PM2024-05-27T15:20:15+5:302024-05-27T15:26:11+5:30

अक्षय आणि ख्याती यांचं लग्न अवघ्या आठवड्यापूर्वी झालं होतं, ते गेमिंग झोनमध्ये आले होते. याच दरम्यान आग लागली आणि दोघांचा मृत्यू झाला.    

rajkot gaming zone fire newly married couple womans sister killed | हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू

फोटो - ndtv.in

गुजरातमधील राजकोट गेमिंग झोनमधील आगीच्या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. या दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये अक्षय ढोलरिया आणि ख्याती हे नवविवाहित कपल देखील होतं. अक्षय आणि ख्याती यांचं लग्न अवघ्या आठवड्यापूर्वी झालं होतं, ते गेमिंग झोनमध्ये आले होते. याच दरम्यान आग लागली आणि दोघांचा मृत्यू झाला.    

24 वर्षीय अक्षय त्याच्या आई-वडिलांसोबत कॅनडामध्ये राहत होता. 20 वर्षीय ख्यातीसोबत लग्न करण्यासाठी तो काही दिवसांपूर्वी राजकोटला आला होता. गेल्या शनिवारी दोघांचं कोर्ट मॅरेज झाले. या वर्षाच्या शेवटी एका भव्य विवाह सोहळ्याची तयारीही सुरू झाली होती. पण ते दोघेही आता या जगात नाहीत. आग इतकी भीषण होती की त्यांचा मृतदेहही ओळखता येत नव्हता. हातातील अंगठीच्या मदतीने अक्षयच्या मृतदेहाची ओळख पटली. 

ख्यातीचा मृतदेह डीएनए चाचणीसाठी पाठवण्यात आला आहेत. वीकेंड डिस्काउंट ऑफरमुळे टीआरपी नावाच्या गेमिंग झोनमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती. येथे तिकिटाची किंमत 99 रुपये होती. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे, मात्र तपासानंतरच नेमकं कारण समजेल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

अग्निशमन विभागाच्या परवानगीशिवाय हे मनोरंजन सेंटर सुरू होतं, मालकांकडे अग्निशमन विभागाची एनओसीही नव्हती, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. इथे आणखी एक अडचण होती ती म्हणजे बाहेर पडण्यासाठी एकच गेट होता. पोलिसांनी टीआरपी गेम झोनचे मालक आणि व्यवस्थापक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, आगीची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) लवकरात लवकर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

Web Title: rajkot gaming zone fire newly married couple womans sister killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.