1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:30 IST2025-10-01T17:29:52+5:302025-10-01T17:30:24+5:30
iPhone 17 Pro Max : ग्राहकांमध्ये iPhone 17 Pro Max ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.

1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
iPhone 17 Pro Max : Apple ने 9 सप्टेंबर रोजी आपली iPhone 17 सीरीज लॉन्च केली. विक्री सुरू होताच दुकानांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. विशेषतः iPhone 17 Pro Max साठी प्रचंड मागणी दिसून आली. भारतात या फोनच्या 256GB व्हेरिएंटची किंमत ₹1,34,900 ठेवण्यात आली आहे. पण, तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की, इतका महागडा फोन नेमका किती रुपयात तयार होतो? चला जाणून घेऊ...
iPhone 17 Pro Max तयार करायला किती खर्च येतो?
Instagram वरील Pubity या पेजने iPhone 17 Pro Max (256GB) च्या उत्पादन खर्चाचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलेले आकडे ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले.
फोनची बाहेरील फ्रेम : $20.79 (₹1,900 अंदाजे)
बॅटरी : $4.10 (₹370 अंदाजे)
स्टोरेज (डेटा पावर) : $20.59 (₹1,840 अंदाजे)
RAM : $21.80 (₹1,940 अंदाजे)
कॅमेरा सिस्टम : $80 (₹7,110 अंदाजे)
A19 Pro चिप : $90 (₹8,100 अंदाजे)
5G मॉडेम : $90 (₹8,100 अंदाजे)
डिस्प्ले : $80 (₹7,110 अंदाजे)
या सर्व खर्चाची बेरीज केली तर, एक iPhone 17 Pro Max तयार करण्यासाठी कंपनीला फक्त $408 (सुमारे ₹37,000) खर्च येतो.
मग एवढे महाग का विकले जातात?
भारतामध्ये याच मॉडेलची विक्री किंमत आहे ₹1,34,900. म्हणजेच उत्पादन खर्च आणि विक्री किंमतीत तब्बल तीनपटपेक्षा जास्त आहे.
त्याचे प्रमुख कारण :
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D)
मार्केटिंग आणि ब्रँडिंग खर्च
वितरण आणि कर प्रणाली
या अतिरिक्त खर्चामुळेच अंतिम किंमत वाढते.
सोशल मीडियावर चर्चा
थोडक्यात काय तर, iPhone 17 Pro Max चा उत्पादन खर्च कमी असला तरी Apple ची ब्रँड इमेज, R&D, सॉफ्टवेअर आणि मार्केटिंग या गोष्टींमुळे त्याची किंमत गगनाला भिडते. ग्राहक मात्र हा फोन फक्त तंत्रज्ञानासाठीच नव्हे तर स्टेटस सिम्बॉल म्हणूनही विकत घेतात. सध्या सोशल मीडियावर या आकड्यांबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. युजर्स या पोस्टवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.