आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:20 IST2025-09-03T16:20:39+5:302025-09-03T16:20:54+5:30
Apple iPhone 17 price : हा फोन घेण्यासाठी आता अनेकांकडे किडन्या देखील शिल्लक राहिलेल्या नाहीत, असे म्हणावे लागेल अशी त्याची किंमत असणार आहे.

आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...
अॅपल कंपनीचा नवीन आयफोन येत्या काही दिवसांतच लाँच होणार आहे. हा फोन घेण्यासाठी आता अनेकांकडे किडन्या देखील शिल्लक राहिलेल्या नाहीत, असे म्हणावे लागेल अशी त्याची किंमत असणार आहे. या आयफोन १७ सिरीजच्या संभाव्य किंमती समोर आल्या आहेत.
आयफोन १७ च्या किंमतीत जास्त वाढ होण्याची शक्यता तशी कमी आहे. आयफोन १७ ची सुरुवातीची किंमत $७९९ असू शकते, जी मागील मॉडेलसारखीच आहे. यावेळी येणारा नवीन आयफोन १७ एअर थोडा महाग असू शकतो, म्हणजेच $८९९ ते $९४९ दरम्यान त्याची किंमत असू शकते.
गेल्या वर्षी आयफोन १६ प्लस $८९९ मध्ये लाँच झाला होता. आयफोन १७ प्रो ची किंमत गेल्यावेळपेक्षा १०० डॉलरनी जास्त असू शकते. तर आयफोन १७ प्रो मॅक्सची किंमत $१,१९९ एवढी असू शकते.
भारतात आयफोन १६ ची सुरुवातीची किंमत ७९,९०० रुपये होती. प्लस व्हेरिएंटची किंमत ८९,९०० रुपये होती. तर १६ प्रो आणि प्रो मॅक्स अनुक्रमे १,१९,९०० रुपये आणि १,४४,९०० रुपये होती. यामुळे आयफोन १७ देखील सुमारे ७९,९०० रुपयांना लाँच केला जाऊ शकतो. आयफोन १७ एअरची किंमत ८९,९०० रुपये किंवा थोडी जास्त असू शकते. त्याच वेळी, आयफोन १७ प्रोची किंमत १०० डॉलरने वाढू शकते, त्यानंतर बेस व्हेरिएंटची किंमत १,३०,००० रुपयांच्या जवळपास असू शकते.