लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 14:31 IST2025-09-07T14:27:45+5:302025-09-07T14:31:03+5:30

रविवारी लाल समुद्रात समुद्राखालील केबल कट झाल्यामुळे भारतासह आशियातील अनेक भागात इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. मायक्रोसॉफ्टने त्यांच्या स्टेटस वेबसाइटवर म्हटले आहे की, लाल समुद्रात समुद्राखालील केबल तुटल्यामुळे पश्चिम आशियामध्ये इंटरनेटचे स्पीड कमी झाले आहे.

Internet cable breaks in Red Sea; Many countries in Asia including India and Pakistan affected | लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

मागील काही तासांपासून इंटरनेटचे स्पीड कमी झाल्याचे पाहायला मिळाले. याचे कारण आता समोर आले आहे. इंटरनेटचे स्पीड फक्त भारतातच नाही तर आशियातील पश्चिम आणि पूर्वेकडील इतर देशांतही कमी झाले.  लाल समुद्रात समुद्राखालील केबल तुटल्यामुळे ही समस्या आली असल्याचे समोर आले. यामागील कारण अजूनही समोर आलेले नाही.

येमेनमधील हुथी बंडखोर या केबल्सना लक्ष्य करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बंडखोर हे गाझामधील हमासविरुद्धचे युद्ध संपवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. हुथी बंडखोरांनी यापूर्वी अशा हल्ल्यांना नकार दिला आहे.

रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू

इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर परिणाम

याचा परिणाम आता इंटरनेट कनेक्टिव्हीटीवर झाला आहे. याबाबत इंटरनेट अॅक्सेसवर लक्ष ठेवणारी संस्था नेटब्लॉक्सने म्हटले आहे की, लाल समुद्रात अनेक समुद्राखालील केबल्स कापल्यामुळे भारत आणि पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला आहे. सौदी अरेबियातील जेद्दाह जवळील SMW4 आणि IMEWE केबल सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही समस्या दिसत आहे, असंही त्यांनी सांगितले.

दक्षिण पूर्व आशियामध्य पूर्वपश्चिम युरोप 4 (SMW4) केबल भारतीय कंपनी टाटा कम्युनिकेशन्सद्वारे चालवली जाते, ती एका मोठ्या भारतीय समुहाचा भाग आहे. इंडिया मध्य पूर्वपश्चिम युरोप (IMEWE) केबल दुसऱ्या कन्सोर्टियमद्वारे चालवली जाते, याचे निरीक्षण अल्काटेल-लुसेंट करते. दोन्ही कंपन्यांनी अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दुबईमध्येही परिणाम

सौदी अरेबियाने अद्याप इंटरनेट सेवांमध्ये व्यत्यय आल्याचे मान्य केलेले नाही आणि तेथील अधिकाऱ्यांनी टिप्पणीसाठी केलेल्या विनंत्यांना प्रतिसाद दिला नाही. संयुक्त अरब अमिरातीमध्ये, तिथे दुबई आणि अबू धाबी आहेत, देशातील सरकारी कंपन्यांच्या डू आणि एतिसलातच्या नेटवर्कवरील इंटरनेट वापरकर्त्यांनी इंटरनेटचे स्पीड कमी असल्याची तक्रार केली. सरकारनेही ही समस्या लगेच मान्य केली नाही.

मायक्रोसॉफ्टने काय सांगितले?

मायक्रोसॉफ्टने स्टेटस वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. 'लाल समुद्रात समुद्राखालील केबल तुटल्यामुळे पश्चिम आशियामध्ये इंटरनेटचे स्पीड कमी होऊ शकते. रेडमंड, वॉशिंग्टनस्थित कंपनीने तपशील दिलेला नाही, पण पश्चिम आशियातून न जाणाऱ्या इंटरनेट ट्रॅफिकवर त्याचा परिणाम झाला नाही असे यामध्ये म्हटले आहे. 

Web Title: Internet cable breaks in Red Sea; Many countries in Asia including India and Pakistan affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.