शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्राम हॅक झालंय? टेन्शन घेऊ नका, 'या' ३ स्टेप्स फॉलो कराल तर लगेच रिकव्हर होईल अकाउंट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:59 IST

जर तुमच्या अकाउंटचा पासवर्ड आपोआप बदलला असेल किंवा लॉगिन करताना 'चुकीचा पासवर्ड' असा मेसेज येत असेल, तर समजून जा की तुमचे अकाउंट हॅकर्सच्या तावडीत सापडले आहे.

आजच्या काळात इंस्टाग्राम हे केवळ फोटो शेअर करण्याचे माध्यम राहिलेले नसून ती आपली डिजिटल ओळख बनली आहे. पण, विचार करा... एका सकाळी तुम्ही उठता आणि पाहता की तुमच्या अकाउंटवरून तुमच्या नकळत विचित्र पोस्ट किंवा मेसेज जात आहेत. हा अनुभव एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नसतो. जर तुमच्या अकाउंटचा पासवर्ड आपोआप बदलला असेल किंवा लॉगिन करताना 'चुकीचा पासवर्ड' असा मेसेज येत असेल, तर समजून जा की तुमचे अकाउंट हॅकर्सच्या तावडीत सापडले आहे.

अशा परिस्थितीत घाबरून न जाता, खालील उपाययोजना करून तुम्ही तुमचे अकाउंट परत मिळवू शकता.

अकाउंट हॅक झाल्यास सर्वात आधी काय करावे?

१. पासवर्ड रिसेट करा: सर्वात आधी 'Forgot Password' या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या रजिस्टर ईमेल किंवा मोबाईल नंबरवर एक लिंक येईल, त्यावरून तातडीने नवा पासवर्ड तयार करा. 

२. ईमेल तपासा: जर हॅकरने तुमचा ईमेल पत्ताच बदलला असेल, तर इंस्टाग्रामकडून तुम्हाला एक 'Security Alert' मेल आला असेल. त्या मेलमधील 'Revert this change' या पर्यायावर क्लिक करा. यामुळे हॅकरने केलेले बदल रद्द होतील. 

३. सर्व उपकरणांमधून लॉगआउट करा: पासवर्ड बदलताना 'Log out of all devices' हा पर्याय निवडा, जेणेकरून हॅकरच्या फोनमधून तुमचे अकाउंट आपोआप बंद होईल.

इंस्टाग्रामकडून मदत कशी मिळवाल?

जर तुम्ही लॉगिन करू शकत नसाल, तर इंस्टाग्राम ॲपमधील 'Need more help?' या पर्यायावर टॅप करा. येथे तुम्ही तुमचे अकाउंट हॅक झाल्याची तक्रार नोंदवू शकता. अनेकदा इंस्टाग्राम तुमची ओळख पटवण्यासाठी 'सेल्फी व्हिडिओ' किंवा इतर कागदपत्रे मागते. योग्य माहिती दिल्यास काही दिवसांत तुमचे अकाउंट तुम्हाला पुन्हा मिळू शकते.

भविष्यात हॅकिंग टाळण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा

मजबूत पासवर्ड: पासवर्डमध्ये अक्षरे, अंक आणि विशेष चिन्हांचा ($#@!) वापर करा. तसेच, तो पासवर्ड इतर कोणत्याही सोशल मीडिया किंवा वेबसाईटसाठी वापरू नका.

Two-Factor Authentication (2FA): हे फिचर तुमच्या अकाउंटसाठी सुरक्षा कवचासारखे काम करते. हे ऑन असल्यास, लॉगिन करताना तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी (OTP) येईल, त्याशिवाय अकाउंट उघडणार नाही.

फिशिंग लिंक्सपासून दूर राहा: 'मोफत ब्लू टिक' किंवा 'बक्षीस लागल्याचे' आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. हॅकर्स अनेकदा इंस्टाग्रामसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट वेबसाईटवरून तुमची माहिती चोरतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Instagram hacked? Recover your account quickly with these simple steps.

Web Summary : If your Instagram is hacked, reset password, check email for alerts, logout devices. Contact Instagram support if needed. Enable two-factor authentication and avoid phishing links for future security.
टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडियाtechnologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइम