काय सांगता? जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात; तर 'या' देशात आहे सर्वात महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 11:31 AM2020-08-26T11:31:59+5:302020-08-26T11:32:33+5:30

जगभरात वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडून मोबाईल डेटाची ऑफर देण्यात येते. मोबाईल डेटाची सर्वात कमी किंमत भारतात असल्याची माहिती मिळत आहे.

india offers cheapest mobile data in the world where cost of 1gb data is only 7 rupees | काय सांगता? जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात; तर 'या' देशात आहे सर्वात महाग

काय सांगता? जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात; तर 'या' देशात आहे सर्वात महाग

Next

नवी दिल्ली - मोबाईल हा प्रत्येकाच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. हल्ली सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जगभरात वेगवेगळ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडून मोबाईल डेटाची ऑफर देण्यात येते. मोबाईल डेटाची सर्वात कमी किंमत भारतात असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच जगभरात सर्वात स्वस्त डेटा भारतात मिळतो. नोव्हेंबर 2018 च्या तुलनेत भारतात प्रति 1 जीबी मोबाइल डेटाची किंमत जवळपास 65 टक्क्यांनी कमी झाली आहे. 

भारतात जास्तीत जास्त टेलिकॉम कंपन्याकडून डेली डेटा ऑफर करणारे प्लॅन दिले जात आहे. यूके बेस्ड फर्म Cable.co.uk की 2020 वर्ल्डवाइड मीडिया डेटा प्रायसिंग रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, भारतात प्रति गीगाबाईट युजर्सला केवळ 6.7 रुपये (0.09 डॉलर) रक्कम द्यावी लागते. जी जगाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तसेच 2018 मध्ये प्रति 1 जीबी डेटासाठी 18. 5 रुपये मोजावे लागत होते. दोन वर्षात त्याची किंमत 65 टक्क्यांनी कमी झाली आहे.

यूएसमध्ये 1 जीबी डेटा साठी युजर्सला 8 डॉलर (594 रुपये आणि यूकेमध्ये 1.4 डॉलर म्हणजेच 104 रुपये मोजावे लागतात. डेटाच्या ग्लोबल कॉस्ट म्हणजेच जगभरातील किमतीची साधारणपणे डॉलर (जवळपास 372 रुपये) प्रति जीबी आहे. स्टडी करणाऱ्या फर्म Cable.co.uk च्या कंज्यूमर टेलिकॉम्स एनालिस्ट डॅन हॉडलने भारतात टेलिकॉम ऑपरेटर्स आधीच्या तुलनेत जास्त डेटा पॅक ऑफर करीत असल्याचं सांगितलं आहे.

3 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2020 या दरम्यान अभ्यासासाठी 228 वेगवेगळ्या देशांत 5554 मोबाईल डेटा प्लॅनचा सर्व्हे करण्यात आला आहे. सर्वात महाग डेटा सेंट हेलेना आयलँडमध्ये आहे. या ठिकाणी 1 जीबी साठी 52.5 डॉलर (जवळपास 3897 रुपये) मोजावे लागतात. स्रवात स्वस्त डेटा पॅकच्या टॉप 10 देशात श्रीलंका आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे. भारतात कंपन्या स्वस्त प्लॅन ऑफर करीत आहेत. पुढील सहा महिन्यांत रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोनकडून प्लॅन महाग करण्यात येण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

मेड इन चायनाचा 'या' देशाला बसला मोठा फटका; 3700 निरोगी लोकांना दाखवलं 'कोरोना पॉझिटिव्ह'

CoronaVirus News : देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे 'हे' आहे कारण, ICMR ने दिला गंभीर इशारा

Mahad Building Collapse: 'इमारत असो वा समाज, पाया हा मजबूतच हवाच'; सुबोध भावेचं सूचक ट्विट 

CoronaVirus News : एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला की पालिकेला दीड लाख रुपये मिळतात?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

"गद्दार भाजपाच्या चीन प्रेमाचा धिक्कार, बंदी घातलेल्या चीनी अ‍ॅपचा करताहेत वापर"

Web Title: india offers cheapest mobile data in the world where cost of 1gb data is only 7 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.