CoronaVirus News : एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला की पालिकेला दीड लाख रुपये मिळतात?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 04:07 PM2020-08-25T16:07:28+5:302020-08-25T16:20:26+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. 

Fact Check Central Govt Giving Rs 1.5 Lakh To Municipalities Every COVID Positive Patient | CoronaVirus News : एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला की पालिकेला दीड लाख रुपये मिळतात?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

CoronaVirus News : एक कोरोना पॉझिटिव्ह सापडला की पालिकेला दीड लाख रुपये मिळतात?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 31,67,324 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60,975 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 848 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 58,390 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अनेक मेसेज सध्या व्हायरल होत आहेत. 

केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे पालिकेला दीड लाख रुपये मिळतात असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कोरोना रुग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रुपये मिळत असल्यामुळे हा सर्व धंदा सुरू झाला आहे, अशी ऑडिओ क्लिप प्रसारित होत आहे. मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावे ही क्लिप फिरत असल्याने ती गांभीर्यानेही घेतली जात आहे; मात्र असा कोणताही निधी दिला जात नसून, हा क्लिपमधील संदेश खोटा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचं समोर आलं आहे.

आमदार जैन यांची ही ऑडिओ क्लिप वेगाने प्रसारित झाली आहे. 'केंद्र सरकार प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे दीड लाख रुपये देत असल्याने खासगी लॅबना हाताशी धरून अहवाल पॉझिटिव्ह आणले जात आहेत. एकदा का दीड लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली की मग तुमचा आजार बरा झाला म्हणून तुम्हाला घरी पाठवले जाते. हा सगळा धंदा सुरू आहे. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊ नका. घरातच काढा घ्या, गरम पाणी प्या. व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घ्या' असा सल्ला या क्लिपमधून देण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून सर्वसामान्यांच्या जिवाचे कुणाला काही पडलेले नाही. जो तो एकमेकांचे पाय ओढण्याच्या नादात आहे. असे न करता एकमेकांना सहकार्य करा, असे आवाहनही या क्लिपमधून करण्यात आले आहे.



कोरोना संदर्भातील या क्लिपबाबत विचारणा झाल्यानंतर खरोखरच असा निधी मिळतो का, याची माहिती घेतली असता, तसा कोणताही निधी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य शासनाचा आरोग्य विभाग यामार्फत जो निधी दिला जातो तो उपचारांसाठीची उपकरणे, औषधे यासाठी दिला जातो. कोणत्याही शासकीय रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना पैसे घेतले जात नाहीत. महात्मा फुले योजनेमध्ये जी खासगी आणि विश्वस्त रुग्णालये आहेत. ती मात्र रुग्णाच्या नावावर फुले योजनेतून प्रस्ताव दाखल करून बिलाची रक्कम भागवून घेत आहेत ही वस्तुस्थिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"गद्दार भाजपाच्या चीन प्रेमाचा धिक्कार, बंदी घातलेल्या चीनी अ‍ॅपचा करताहेत वापर"

CoronaVirus News : काँग्रेसच्या संकटमोचकावरच कोरोनाचे संकट; डी. के. शिवकुमार पॉझिटिव्ह

सायकल घेणं शक्य नव्हतं म्हणून बाप-लेकानं केला भन्नाट 'जुगाड'; Video तुफान व्हायरल

थरुरांच्या घरातच झाली होती सर्व तयारी; काँग्रेसमध्ये खळबळ माजवणाऱ्या 'त्या' पत्राची इनसाईड स्टोरी

Video - "राजकारणातून गांधी-नेहरु परिवाराचं अस्तित्व संपलं"; भाजपा नेत्याने साधला निशाणा

 

Read in English

Web Title: Fact Check Central Govt Giving Rs 1.5 Lakh To Municipalities Every COVID Positive Patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.