अलर्ट! कोणीतरी गुपचूप तुमचं WhatsApp चॅट वाचतंय का?; लगेचच बंद करा 'ही' सेटींग 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:00 PM2022-05-11T12:00:31+5:302022-05-11T12:01:42+5:30

WhatsApp Chat : तुमचं WhatsApp Account इतर जागांवर लॉगइन असेल, तर तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो.

how to unlink or logout from whatsapp linked devices under multi device support | अलर्ट! कोणीतरी गुपचूप तुमचं WhatsApp चॅट वाचतंय का?; लगेचच बंद करा 'ही' सेटींग 

अलर्ट! कोणीतरी गुपचूप तुमचं WhatsApp चॅट वाचतंय का?; लगेचच बंद करा 'ही' सेटींग 

googlenewsNext

नवी दिल्ली - WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून ते संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp ने काही दिवसांपूर्वी मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचर युजर्ससाठी लाँच केलं आहे. या फीचरद्वारे आपलं WhatsApp Account प्रायमरी फोनशिवाय इतर चार डिव्हाइसवरही वापरता येऊ शकतं. महत्त्वाची बाब म्हणजे इतर डिव्हाइसवर WhatsApp चालवण्यासाठी तुमच्या प्रायमरी डिव्हाइसमध्ये इंटरनेट एक्टिव्ह असण्याची गरज नाही.

फीचरमध्ये सर्वाधिक लक्ष याच्या Link Devices सेटिंगकडे देणं गरजेचं आहे. जर तुमचं WhatsApp Account इतर जागांवर लॉगइन असेल, तर तुमच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो. जर दुसरा कोणी व्यक्ती यापैकी एखाद्या डिव्हाइसचा वापर करत असेल, तर तुमचं WhatsApp Chat कोणीही पाहू शकतं. मल्टी डिव्हाइस फीचरमुळे अकाउंट अधिक काळपर्यंत लॉगइन राहू शकतं. या समस्येपासून वाचण्यासाठी Unlink Devices फीचर मिळतं.

- सर्वात आधी WhatsApp ओपन करा.
- आता तीन डॉटवर क्लिक करा.
- Link Devices चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता इथे अशा सर्व डिव्हाइसेसची लिस्ट येईल, जिथे-जिथे तुमचं WhatsApp Login आहे.
- ज्या डिव्हाइसमधून WhatsApp Logout करायचं आहे, त्यावर क्लिक करा.
- आता Logout बटणावर टॅप करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मस्तच! आता गुपचूप 'असं' पाहू शकता दुसऱ्यांचं WhatsApp स्टेट्स; Seen मध्ये दिसणार नाही तुमचं नाव

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज हे स्टेटसला ठेवत असतो. आपलं स्टेटस कोणीकोणी पाहिलं हे देखील समजतं. काही वेळा एखाद्याचं स्टेटस आपल्याला पाहायची इच्छा असते पण ते समोरच्या व्यक्तीला समजू नये असं देखील वाटतं असतं. एखाद्याचं स्टेटस गुपचूप पाहायची इच्छा असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे.

'असं' पाहा दुसऱ्यांचं स्टेटस

- सर्वप्रथम WhatsApp ओपन करा. 
- होम स्क्रीनवरील डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
-  सेटिंग्सवर टॅप करा. सेटिंग्समध्ये अकाऊंट पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर आता प्रायव्हसी पर्यायावर क्लिक करा.
- यामध्ये Read Receipt फीचर डिसेबल करा.

रीड रिसिप्ट फीचर बंद केल्यानंतर तुम्ही WhatsApp स्टेटस पाहिले की नाही हे समजणार नाही. मात्र, तुमचं स्टेट्स देखील कोणी पाहिलं हे देखील तुम्हाला समजणार नाही. इतर माध्यमातून देखील तुम्ही लपून-छपून स्टेट्स पाहू शकता.
 

Web Title: how to unlink or logout from whatsapp linked devices under multi device support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.