सावधान! एक मेसेज आणि बँक अकाऊंट होईल रिकामं; Instagram वर मोठा फिशिंग स्कॅम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:28 AM2024-04-24T10:28:49+5:302024-04-24T10:31:42+5:30

सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे. अशा परिस्थितीत इन्स्टाग्राम वापरताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

how to protect your instagram from phishing scam follow these easy steps | सावधान! एक मेसेज आणि बँक अकाऊंट होईल रिकामं; Instagram वर मोठा फिशिंग स्कॅम

सावधान! एक मेसेज आणि बँक अकाऊंट होईल रिकामं; Instagram वर मोठा फिशिंग स्कॅम

मेटाच्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक मोठा फिशिंग स्कॅम सुरू आहे. या प्लॅटफॉर्मवर लोकांना आमिष दाखवून संवेदनशील माहिती चोरली जाते आणि मग तेथून फसवणुकीचा मार्ग सुरू होतो. सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरू आहे. अशा परिस्थितीत इन्स्टाग्राम वापरताना काही खास गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

चुकूनही लिंकवर क्लिक करू नका

इन्स्टाग्रामवरील स्कॅमर लोकांना मोफत वस्तू, भेटवस्तू किंवा अकाऊंट व्हेरिफिकेशनच्या नावाने लिंकवर क्लिक करण्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर युजर त्या लिंकवर क्लिक करतो आणि फोनची सर्व माहिती स्कॅमरच्या हाती लागते. अशा परिस्थितीत तुम्ही त्या लिंक्सवर क्लिक करणे टाळावे. ते तुमच्या ऑनलाईन एक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतं.

अनोळखी व्यक्तीचे प्रोफाइल तपासा

जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला मेसेज पाठवला तर तुम्ही ओळखत नसलेल्या लोकांपासून सावध राहावे. तुम्ही त्यांचे प्रोफाइल तपासावे. जसे की ते व्हेरिफाईड अकाऊंट आहे की नाही. काही चुकीचे वाटल्यास त्या मेसेजला रिप्लाय देणे टाळा आणि लगेच तक्रार करून ब्लॉक करा.

वैयक्तिक डेटा कोणाशीही शेअर करू नका

हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की वैयक्तिक डेटा कोणत्याही व्यक्तीसह शेअर करू नका. जसे की पासवर्ड, क्रेडिट कार्ड यासंबंधीची माहिती. स्कॅमर तुम्हाला वैयक्तिक माहिती मिळवण्यासाठी आमिष दाखवतील आणि नंतर बँक खात्यातील सर्व पैसे चोरतील.

ओटीपी किंवा पासवर्ड शेअर करू नका

हे लक्षात घेण्यासारखे आहे की Instagram वर कोणत्याही प्रकारचे व्हेरिफिकेशन नाही. अशा परिस्थितीत, कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत ओटीपी किंवा पासवर्ड किंवा इतर तपशील शेअर करू नका.

Web Title: how to protect your instagram from phishing scam follow these easy steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.