तुमच्या Aadhaar Card वर किती सिमकार्ड आहेत?; काही मिनिटांत मिळवा अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 11:43 PM2021-11-06T23:43:40+5:302021-11-06T23:44:06+5:30

आपल्या नकळत बनावट कागदपत्रांच्या आधारेही आपल्या नावे सिमकार्ड घेतलं जाऊ शकतं, या प्रोसेसवरून तुम्हाला तुमच्या नावे किती सिमकार्ड आहेत याची माहिती मिळेल.

how many sim cards have been taken on your aadhaar card know procedure to check | तुमच्या Aadhaar Card वर किती सिमकार्ड आहेत?; काही मिनिटांत मिळवा अशी माहिती

तुमच्या Aadhaar Card वर किती सिमकार्ड आहेत?; काही मिनिटांत मिळवा अशी माहिती

googlenewsNext

ओळख पटवून देण्यासाठी Aadhaar Card भारतीयांच्या कमी येतं. अनेक सरकारी योजनांसाठीही आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे आधार हे भारतीयांसाठी महत्त्वाचं दस्तऐवज बनलं आहे. बऱ्याचदा आधारचा दुरुपयोग सुद्धा केला जात असल्याच्या अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात.. दूरसंचार विभागानं (DoT)  यासाठी आपल्या वेबसाईटवर एक मोठा बदल केला आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा होणार दुरुपयोग समजू शकतो. DoT च्या या नवीन सुविधेचा वापर करून तुम्ही सहज तुमच्या आधार नंबरचा वापर करून घेतलेल्या मोबाईल नंबरची माहिती मिळवू शकता. इतकेच नव्हे तर तुमच्या ओळखीचे नसलेले किंवा तुम्ही वापरत नसलेले नंबर्स तुम्ही डिस्कनेक्ट देखील करू शकता. यासाठी तुम्हाला TAFCOP वेबसाईटची मदत घ्यावी लागेल. 

  • सर्वप्रथम टेलीकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंज्यूमर (Telecom Analytics for Fraud Management) प्रोटेक्शन पोर्टल https://tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाईटवर जा. 
  • इथे तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर एंटर करा. 
  • त्यानंतर ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट करा.  
  • आता तुमच्या आधार नंबरचा वापर करून विकत घेतलेले सर्व नंबर वेबसाईटवर दिसतील.  
  • इथून तुम्ही अनोळखी किंवा अनावश्यक नंबर रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकता. 


TAFCOP पोर्टलचा उपयोग   
तुम्ही एका आधार कार्ड नंबरवर फक्त 9 मोबाईल कनेक्शन घेऊ शकता, असे निर्देश डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने दिलेले आहेत. ज्या युजर्सच्या नावावर 9 पेक्षा जास्त कनेक्शन आहेत, त्यांना एसएमएसच्या माध्यमातून सूचना पाठवण्यात येईल. असे युजर्स या पोर्टलवर जाऊन वरील प्रक्रिया पूर्ण करून अनावश्यक नंबर रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकतात.   

Web Title: how many sim cards have been taken on your aadhaar card know procedure to check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.