स्मार्टफोनचा काही मिनिटातच असा होऊ शकतो वायरलेस माउस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 14:30 IST2018-12-08T14:07:24+5:302018-12-08T14:30:32+5:30
अगदी मोफत काही मिनिटातच तुमच्या स्मार्टफोनचा माउस करू शकता. जुन्या स्मार्टफोनचा वापर करून कमी वेळात वायरलेस माउस कसा तयार करायचा हे जाणून घेऊया.

स्मार्टफोनचा काही मिनिटातच असा होऊ शकतो वायरलेस माउस
नवी दिल्ली - लॅपटॉप आणि संगणकाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र याचा वापर करताना प्रामुख्याने माउसचा खूप उपयोग होतो. बाजारात वायरलेस माउस उपलब्ध असून लॅपटॉप आणि संगणकापासून दूर ठेवून त्याचा वापर करता येतो. वायरलेस माउसची किंमत अधिक असल्याने अनेक लोक त्याचा वापर करत नाहीत. मात्र तुम्ही अगदी मोफत काही मिनिटातच तुमच्या स्मार्टफोनचा माउस करू शकता. जुन्या स्मार्टफोनचा वापर करून कमी वेळात वायरलेस माउस कसा तयार करायचा हे जाणून घेऊया.
स्मार्टफोनचा काही मिनिटातच असा तयार करा वायरलेस माउस
- स्मार्टफोनला वायरलेस माउस करण्यासाठी सर्वप्रथम Keyboard App (AndroMouse 3.0) हे अॅप इन्स्टॉल करावं लागेल.
- गूगल प्ले स्टोरवरून अगदी मोफत हे अॅप डाऊनलोड करता येईल. संगणकामध्ये ही हे अॅप डाऊनलोड करता येईल. त्यासाठी Andromouse Server 3 या नावाने ते उपलब्ध असेल.
- संगणकामध्ये हे अॅप डाऊनलोड झाल्यावर युजर्सला ते ओपन करावे लागेल. आयपी अॅड्रेस दाखवला जाईल. सर्व संगणकामध्ये तो यूनिक असतो. तो आयपी अॅड्रेस लक्षात ठेवावा.
- अॅन्ड्रॉईड स्मार्टफोनमध्ये ही अॅप इन्स्टॉल करून ओपन करा. ओपन केल्यावर दोन पर्याय दिसतील. यामध्ये पहिला पर्याय हा वाय-फाय तर दुसरा ब्ल्यू टूथचा असेल. यामध्ये वाय-फाय या पर्यायाला सिलेक्ट करा.
- स्मार्टफोन आणि कम्पूटरवर आलेला आयपी अॅड्रेस एंटर करून मोबाईल अॅपला ते कनेक्ट करा. त्यानंतर स्मार्टफोन हा वायरलेस माउसप्रमाणे वापरणे शक्य आहे.