how to check how many apps and website are linked to your gmail password | किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?; चेक करून 'असं' करा डिलिंक

किती Apps आणि Websites शी लिंक आहे तुमचा Gmail पासवर्ड?; चेक करून 'असं' करा डिलिंक

नवी दिल्ली - अनेक वेबसाईट्सवर लॉग-इन करण्यासाठी आपल्य़ाकडे दोन पर्याय असतात. यासाठी एक तर संपूर्ण माहिती भरावी लागते किंवा नवा आयडी-पासवर्ड बनवावा लागतो किंवा आपल्या जीमेल (Gmail) अकाऊंटवरुन त्या वेबसाईटवर एन्ट्री करावी लागते. त्यासाठी आपलं जीमेल अकाऊंट त्या वेबसाईटशी लिंक केलं जातं. मात्र काही दिवसांनी एकदा एखाद्या वेबसाईटचा वापर केल्यानंतर त्याचा वापर करणं सोडून दिलं जातं किंवा त्या वेबसाईटचा वापर करणंच बंद करतो. पण तरी देखील आपलं Gmail Account त्या वेबसाईटशी लिंक असतं. अशाप्रकारे किती वेबसाईटशी जीमेल अकाऊंट लिंक आहे आणि त्या साईटवरुन जीमेल डिलिंग करायचं असल्याचं काय करायचं हे जाणून घेऊया...

आपलं Gmail Account किती वेबसाईट्सशी लिंक आहे हे पाहण्यासाठी, मोबाईलच्या Gmail App वर नाही, तर गुगल क्रोमवर (Gmail Chrome) जीमेल सुरू करावं लागेल. येथे तो जीमेल आयडी-पासवर्ड टाकावा लागेल, जो किती वेबसाईटशी लिंक आहे हे पाहायचं आहे. गुगल क्रोमवर लॉग-इन केल्यानंतर एक पेज समोर येईल. येथे स्क्रोल करुन  सर्वात खाली यावं लागेल. येथे View Gmail in: Mobile/ Older version/Desktop दिसेल.

Last Account Acitivity 

Desktop क्लिक करावं लागेल. यानंतर डेस्कटॉपवर जसे मेल दिसतात. तसेच सर्व मेल दिसतील. या पेजवरही स्क्रोल करुन सर्वात खाली यावं लागेल. येथे तुम्ही वापरलेल्या Gmail ची माहिती असेल. याच माहितीच्या बाजूला एक Details असा पर्याय दिसेल. तेथे Last Account Acitivity दिसेल, तेथे Details वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Security Checkup वर क्लिक करावं लागेल.

गरज नसलेलं अकाऊंट करा डिलीट 

सर्वात खाली Your saved password दिसेल. येथे तुमचं जीमेल अकाऊंट किती वेबसाईट्सवर आणि App शी लिंक आहे, हे दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Go to Password Checkup वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा जीमेल आयडी-पासवर्ड येथे टाकावा लागेल. येथे त्या अनेक App आणि Websites बाबत माहिती मिळेल, जेथे तुमचं जीमेल अकाऊंट लिंक आहे. येथूनच साईड पॅनलवर क्लिक करुन अकाऊंट लॉग-आऊट करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अरे व्वा! ...तर 5G सारखा होईल तुमच्या 4G इंटरनेटचा स्पीड; जाणून घ्या नेमकं कसं? 

स्मार्टफोन युजर्सच्या संख्येत मोठी वाढ होत तर दुसरीकडे स्मार्टफोनवर डेटाचा वापर करण्यासाठी कंपन्या एका पेक्षा एक जबरदस्त डेटा प्लॅन्स ऑफर करत आहेत. तसेच युजर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या नेटवर्कला मजबूत करण्यासाठी कंपन्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनला 4G VoLTE सपोर्टसह लाँच करत आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी नेटवर्कची समस्या वाढते आहे. त्यामुळे इंटरनेट स्पीडमध्ये काम करत नाही. इंटरनेट स्पीड कमी असल्याची अनेकांची तक्रार असते. मात्र काही सोप्या पद्धतीने फोनचा इंटरनेट स्पीड वाढवता येतो.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

Web Title: how to check how many apps and website are linked to your gmail password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.