शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
3
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
4
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
5
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
7
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
8
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
9
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
10
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
11
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
12
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
13
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
14
झाडाला मिठी मारता, मग बकरीला का नाही? नितेश राणेंचा पर्यावरणप्रेमींना सवाल; म्हणाले, 'हा भाजपचा कार्यक्रम नाही'
15
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
16
असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील पहिला गोलंदाज ठरला स्टार्क; पाकच्या वसीम आक्रमचा विक्रमही मोडला
17
Mumbai: गोरेगावच्या कॉलेजमध्ये बुरख्यावरून वाद; विद्यार्थिनींचे उपोषण, एमआयएमचा पाठिंबा!
18
अधिवेशनात विरोधक प्रश्न विचारणार म्हणून जमीन प्रकरणात कारवाईचा दिखावा; विरोधकांचा आरोप
19
बापमाणूस! "मी म्हातारा झालो नाही, पैसे कमवेन, तू फक्त..."; रात्री २ वाजता लेकीचा वडिलांना फोन
20
रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
Daily Top 2Weekly Top 5

गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:34 IST

Google Search 2025 topics in India : क्रिकेट, बॉलीवूड या पारंपारिक विषयांसोबतच भारतीयांनी यंदा तंत्रज्ञान, आरोग्य आणि जागतिक घडामोडींमध्येही मोठी उत्सुकता दाखवली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्च इंजिन क्षेत्रातील अग्रणी कंपनी गुगलने, २०२५ या वर्षातील 'सर्च ट्रेंड्स' रिपोर्ट जाहीर केली आहे. या रिपोर्टनुसार, क्रिकेट, बॉलीवूड या पारंपारिक विषयांसोबतच भारतीयांनी यंदा तंत्रज्ञान, आरोग्य आणि जागतिक घडामोडींमध्येही मोठी उत्सुकता दाखवली आहे. 'Google Gemini' ने सर्चमध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले, तर वादग्रस्त विषय आणि आरोग्यविषयक प्रश्नांचाही बोलबाला राहिला.

१. क्रीडा, मनोरंजन आणि सामान्य ज्ञान सैयारा या चित्रपटातील प्रमुख कलाकार अनीत पड्डा आणि अहान पांडे यांना युझर्सनी मोठ्या प्रमाणावर सर्च केले. हा चित्रपट 'टॉप ट्रेंडिंग मूवी'मध्येही अग्रस्थानी राहिला.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे 'ओव्हरऑल सर्च'च्या टॉप १० यादीत होते, तसेच 'न्यूज इव्हेंट' सर्चमध्ये त्यांनी दुसरे स्थान मिळवले.

हॉरर चित्रपटप्रेमींमध्ये 'नॉस्टॅल्जिक थ्रिल' मुळे Final Destination हा चित्रपट सर्वाधिक सर्च केला गेला. डेटिंगच्या सर्चमध्ये Floodlighting हा शब्द ट्रेंडमध्ये होता.

'अर्थ' क्वेरीअंतर्गत "What is ceasefire" (युद्धबंदी म्हणजे काय) हा शब्द सर्वाधिक शोधला गेला. याव्यतिरिक्त युझर्सनी मॉक ड्रील्स, स्टॅम्पेड्स आणि व्हायरल झालेले शब्द जसे की Pookie, 5201314 आणि Nonce याचा अर्थही शोधला.

२. तंत्रज्ञान आणि उपयोगिता यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा विषय सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहिला. AI साधने सर्च करण्याच्या बाबतीत Google Gemini हे 'ओव्हरऑल सर्च टर्म'मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. DeepSeek, Perplexity, ChatGPT, Google AI Studio आणि Flow यांसारख्या इतर AI टूल्सचाही मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात आला.

'Near Me' (माझ्या जवळील) क्वेरीमध्ये "Earthquake near me" (माझ्या जवळील भूकंप) हा विषय पहिल्या स्थानावर होता. यावरून नैसर्गिक आपत्तींबद्दल माहिती घेण्याची लोकांची तत्परता दिसून येते. याशिवाय 'Near Me' टर्ममध्ये दांडिया नाईट, दुर्गा पूजा, आणि पिकलबॉल या कार्यक्रमांनाही युझर्सनी खूप सर्च केले.

३. आरोग्य आणि व्हायरल ट्रेंड्सखराब हवामानामुळे पॉडकास्ट सर्चमध्ये Bryan Johnson on Nikhil Kamath Podcast हा पॉडकास्ट पहिल्या क्रमांकावर ट्रेंडमध्ये राहिला. याव्यतिरिक्त आरोग्यविषयक सर्चमध्ये "Air Quality near me" हा विषयही टॉपवर होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या Haldi Trend व्हिडिओबद्दलही भारतीयांनी गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केले.

या रिपोर्टनुसार, २०२५ मध्ये भारतीय युझर्सनी केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित न करता, आरोग्य, जागतिक घडामोडी आणि भविष्यातील तंत्रज्ञान (AI) यांसारख्या गंभीर विषयांमध्येही सक्रियपणे रस घेतल्याचे स्पष्ट होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian Google Searches: Dharmendra Rumors to AI Trends Dominate 2025

Web Summary : Indians searched cricket, Bollywood, tech, and health on Google in 2025. AI tools like Google Gemini trended. Users also sought info on earthquakes and viral trends. Interest spanned entertainment, global events, and future tech.
टॅग्स :Flashback 2025फ्लॅशबॅक 2025googleगुगलDharmendraधमेंद्र