गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:34 IST2025-12-04T16:33:53+5:302025-12-04T16:34:23+5:30
Google Search 2025 Topics in India : क्रिकेट, बॉलीवूड या पारंपारिक विषयांसोबतच भारतीयांनी यंदा तंत्रज्ञान, आरोग्य आणि जागतिक घडामोडींमध्येही मोठी उत्सुकता दाखवली आहे.

गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
Google India’s Year in Search 2025: दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्च इंजिन क्षेत्रातील अग्रणी कंपनी गुगलने, २०२५ या वर्षातील 'सर्च ट्रेंड्स' रिपोर्ट जाहीर केली आहे. या रिपोर्टनुसार, क्रिकेट, बॉलीवूड या पारंपारिक विषयांसोबतच भारतीयांनी यंदा तंत्रज्ञान, आरोग्य आणि जागतिक घडामोडींमध्येही मोठी उत्सुकता दाखवली आहे. 'Google Gemini' ने सर्चमध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले, तर वादग्रस्त विषय आणि आरोग्यविषयक प्रश्नांचाही बोलबाला राहिला.
१. क्रीडा, मनोरंजन आणि सामान्य ज्ञान
सैयारा या चित्रपटातील प्रमुख कलाकार अनीत पड्डा आणि अहान पांडे यांना युझर्सनी मोठ्या प्रमाणावर सर्च केले. हा चित्रपट 'टॉप ट्रेंडिंग मूवी'मध्येही अग्रस्थानी राहिला.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे 'ओव्हरऑल सर्च'च्या टॉप १० यादीत होते, तसेच 'न्यूज इव्हेंट' सर्चमध्ये त्यांनी दुसरे स्थान मिळवले.
हॉरर चित्रपटप्रेमींमध्ये 'नॉस्टॅल्जिक थ्रिल' मुळे Final Destination हा चित्रपट सर्वाधिक सर्च केला गेला. डेटिंगच्या सर्चमध्ये Floodlighting हा शब्द ट्रेंडमध्ये होता.
'अर्थ' क्वेरीअंतर्गत "What is ceasefire" (युद्धबंदी म्हणजे काय) हा शब्द सर्वाधिक शोधला गेला. याव्यतिरिक्त युझर्सनी मॉक ड्रील्स, स्टॅम्पेड्स आणि व्हायरल झालेले शब्द जसे की Pookie, 5201314 आणि Nonce याचा अर्थही शोधला.
२. तंत्रज्ञान आणि उपयोगिता
यंदा कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हा विषय सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहिला. AI साधने सर्च करण्याच्या बाबतीत Google Gemini हे 'ओव्हरऑल सर्च टर्म'मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. DeepSeek, Perplexity, ChatGPT, Google AI Studio आणि Flow यांसारख्या इतर AI टूल्सचाही मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात आला.
'Near Me' (माझ्या जवळील) क्वेरीमध्ये "Earthquake near me" (माझ्या जवळील भूकंप) हा विषय पहिल्या स्थानावर होता. यावरून नैसर्गिक आपत्तींबद्दल माहिती घेण्याची लोकांची तत्परता दिसून येते. याशिवाय 'Near Me' टर्ममध्ये दांडिया नाईट, दुर्गा पूजा, आणि पिकलबॉल या कार्यक्रमांनाही युझर्सनी खूप सर्च केले.
३. आरोग्य आणि व्हायरल ट्रेंड्स
खराब हवामानामुळे पॉडकास्ट सर्चमध्ये Bryan Johnson on Nikhil Kamath Podcast हा पॉडकास्ट पहिल्या क्रमांकावर ट्रेंडमध्ये राहिला. याव्यतिरिक्त आरोग्यविषयक सर्चमध्ये "Air Quality near me" हा विषयही टॉपवर होता.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या Haldi Trend व्हिडिओबद्दलही भारतीयांनी गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केले.
या रिपोर्टनुसार, २०२५ मध्ये भारतीय युझर्सनी केवळ मनोरंजनावर लक्ष केंद्रित न करता, आरोग्य, जागतिक घडामोडी आणि भविष्यातील तंत्रज्ञान (AI) यांसारख्या गंभीर विषयांमध्येही सक्रियपणे रस घेतल्याचे स्पष्ट होते.