Flipkart वर बंपर ऑफर, Google Pixel 7 वर हजारोंचा डिस्काऊंट, वाचा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 09:16 PM2023-01-03T21:16:38+5:302023-01-03T21:18:58+5:30

फ्लिपकार्टवर सध्या कोणताही सेल सुरू नाही. पण काही स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स सुरू आहेत.

google pixel 7 discount and exchange offer on flipkart | Flipkart वर बंपर ऑफर, Google Pixel 7 वर हजारोंचा डिस्काऊंट, वाचा डिटेल्स...

Flipkart वर बंपर ऑफर, Google Pixel 7 वर हजारोंचा डिस्काऊंट, वाचा डिटेल्स...

Next

नवी दिल्ली-

फ्लिपकार्टवर सध्या कोणताही सेल सुरू नाही. पण काही स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स सुरू आहेत. या ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवा स्मार्टफोन खरेदी करू शकता. Flipkart वरुन Google Pixel 7 फोन अशाच एका जबरदस्त ऑफरसह तुम्ही विकत घेऊ शकणार आहात. 

Google Pixel 7 फोनवर तुम्ही फ्लॅट डिस्काऊंट आणि इतर ऑफर मिळवू शकता. फोन एक्स्चेंज ऑफर आणि बँक डिस्काऊंट देखील मिळत आहे. गुगलचा फ्लॅगशिप फोन यंदाच्या वर्षात लॉन्च झाला आहे. कंपनीनं बऱ्याच कालावधीनंतर भारतात आपला फ्लॅगशीप फोन लॉन्च केला आहे. 

किती रुपयांना खरेदी करु शकता?
Google Pixel 7 फोनवर तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकणार आहात. या फोनवर तुम्ही HDFC बँक कार्डवर तुम्ही ५ हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळवू शकता. ही ऑफर तुम्हाला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दोन्हीवर मिळेल. याशिवाय तु्म्ही २३ हजार रुपयांची एक्सचेंज व्हॅल्यू देखील प्राप्त करू शकता. आता एक्सचेंज प्राइज प्रत्येक डिव्हाइसच्या सद्यस्थितीवर अवलंबून असते. स्मार्टफोन 8GB RAM आणि 128GB स्टोअर ऑप्शन देण्यात आला आहे. 

Google Pixel 7 फ्लिपकार्टवर ५९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. ५ हजार रुपयांच्या डिस्काऊंटनंतर याची किंमत ५४,९९९ रुपये इतकी होते. त्यावर तुम्ही २३ हजार रुपयांचा एक्सचेंज व्हॅल्यू देखील मिळवू शकता. 

Google Pixel 7 चे स्पेसिफिकेशन
स्मार्टफोन 6.32 इंचाचा डिस्प्लेसह आहे. जो 2400x1080 पिक्सल रेज्युलेशनसह आहे. स्क्रीन 90Hz रिफ्रेश रेट आणि 1400Nits चा ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे. हँडसेट Tensor G2 चिपसेटवर काम करतो. यात 8GB RAM आणि 128GB चा स्टोरेज पर्याय देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. 

फोनचा मुख्य कॅमेरा 50MP चा आहे. तर दुसरा कॅमेरा 12MP चा आहे. याशिवाय फ्रंट कॅमेरा 10.8MP चा देण्यात आला आहे. हँडसेटला 4270mAh ची बॅटरी आहे. याशिवाय वायरलेस चार्जिंगचाही पर्याय देण्यात आला आहे. स्मार्टफोन अँड्रॉइड १३ सह उपलब्ध आहे.

Web Title: google pixel 7 discount and exchange offer on flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.