Google ने केलं अलर्ट, कोट्यवधी युजर्सना मोठा धोका; करू नका 'ही' चूक अन्यथा....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:32 AM2024-03-21T10:32:50+5:302024-03-21T10:33:31+5:30

गुगलने एक इशारा दिला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, Google ड्राइव्ह युजर्ससाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

google issues warning spam attacks on the rise in google drive | Google ने केलं अलर्ट, कोट्यवधी युजर्सना मोठा धोका; करू नका 'ही' चूक अन्यथा....

Google ने केलं अलर्ट, कोट्यवधी युजर्सना मोठा धोका; करू नका 'ही' चूक अन्यथा....

Google Drive अत्यंत लोकप्रिय आहे. आजच्या काळात इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक युजर्सचा डेटा हा गुगल ड्राइव्हवर उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्मवर फोटोंपासून मेसेजेसपर्यंत भरपूर डेटा आहे. अशा परिस्थितीत हा डेटा लीक झाल्यास मोठा फटका बसू शकतो. याच दरम्यान गुगलने एक इशारा दिला आहे, ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, Google ड्राइव्ह युजर्ससाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

गुगलने स्पॅमबाबत सावधान राहण्यास सांगितलं आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की, जर तुम्ही गुगल ड्राइव्ह वापरत असाल तर तुम्ही हॅकिंगला बळी पडू शकता. सर्वसामान्य युजर्स मालवेअर आणि फिशिंग अटॅकला बळी पडू शकतात.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुगल ड्राइव्हवर गुगल अकाउंट युजर्सना एक संशयास्पद फाइल पाठवली जात आहे. काही युजर्सनी याबाबत तक्रार केली आहे की त्यांना त्यांच्या Google अकाऊंटवर फाइल रिसीव्ह करण्याची रिक्वेस्ट मिळाली आहे.

गुगलने या स्पॅम अटॅकची माहिती असल्याची पुष्टी केली आहे. यासोबतच कंपनीने म्हटलं आहे की, जर कोणाला अशी कोणतीही संशयास्पद फाइल आढळली तर ती स्पॅम कॅटेगिरीमध्ये मार्क करा. गुगलने म्हटलं आहे की, जर तुम्ही कोणत्याही संशयास्पद फाइलला एक्सप्केट करण्याचं अप्रूव्हल दिलं असेल तर त्या लिंकवर किंवा डॉक्यूमेंटवर क्लिक करू नका.

कोणत्याही युजर्स कोणतीही संशयास्पद फाइल प्राप्त झाल्यास, युजर्स त्याची तक्रार करू शकतो. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, स्मार्टफोनमध्ये कोणतीही फाईल आल्यास स्क्रीनच्या वरती तीन डॉट्स दिसतील. यानंतर तुम्हाला रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. जर फाइल ओपन असेल, तर तुम्हाला राइट क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला ब्लॉक किंवा रिपोर्टचा पर्याय मिळेल.

Web Title: google issues warning spam attacks on the rise in google drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.