सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:47 IST2025-11-21T16:46:41+5:302025-11-21T16:47:03+5:30
गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर आहे. जर तुम्ही ते वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.

सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
गुगल क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर आहे. जर तुम्ही ते वापरत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. गुगलने त्यात एक नवीन झिरो-डे फ्लॉ शोधला आहे. त्याला CVE-2025-13223 असं लेबल देण्यात आलं आहे. सायबर अटॅकर्सनी याच कमतरतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने आता एक सिक्योरिटी पॅच जारी केला आहे आणि युजर्सना शक्य तितक्या लवकर क्रोम अपडेट करण्याचं आवाहन केलं आहे.
क्रोमच्या V8 जावास्क्रिप्ट इंजिनमध्ये हा बग आढळला, ज्यामुळे ब्राउझर एग्झिक्यूशन दरम्यान विशिष्ट प्रकारचा डेटा मिसरीड करतो. यामुळे मेमरी करप्ट होऊ शकते, ज्यामुळे अटॅकर्स टार्गेटेड डिव्हाइसवर मलेशियस कोड रन करू शकतात.
गुगलने म्हटलं आहे की, अटॅकर्सनी हे कमतरता समोर येण्याआधीच त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला होता. गुगलच्या थ्रेट एनालिसिस ग्रुपने १२ नोव्हेंबर रोजी हा बग शोधला. या वर्षीचा हा सातवा झिरो-डे फ्लॉ आहे. याचा अर्थ असा की, २०२५ मध्ये सात वेळा असं झालं आहे आणि हॅकर्सना गुगलच्या आधी या बगची माहिती मिळाली आहे.
गुगल क्रोमची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सतत काम करत आहे आणि या बगसाठी एक सिक्योरिटी पॅच जारी केला आहे. तो युजर्ससाठी रोल आउट केला जात आहे. जर तुम्हाला क्रोममध्ये कोणतं अपडेट पेंडिंग दिसलं तर ते त्वरित इन्स्टॉल करा. अशा वाढत्या सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी क्रोम आणि इतर एप्स नियमितपणे अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो.