Gmail युझर्ससाठी खूशखबर; जून महिन्यापर्यंत मिळणार 'ही' मोफत सर्व्हिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 16:42 IST2021-04-01T16:41:58+5:302021-04-01T16:42:44+5:30
यापूर्वी गुगलनं मार्च महिन्यापर्यंत ही सेवा विनामूल्य देण्याचा घेतला होता निर्णय

Gmail युझर्ससाठी खूशखबर; जून महिन्यापर्यंत मिळणार 'ही' मोफत सर्व्हिस
जर तुम्ही Gmail चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली ठरणार आहे. वास्तविक, गुगलने जीमेलच्या युझर्सना आपली एक खास सेवा विनामूल्य देण्याची घोषणा केली आहे. या अत्यावश्यक सेवेसाठी गुगल जूनपर्यंत आपल्या युझर्सकडून कोणतंही शुल्क घेणार नाही. जीमेलच्या वापरकर्त्यांपर्यंत व्हिडीओ कॉलिंग सेवा गुगल मीटवर जूनपर्यंत पूर्णपणे विनामूल्य दिली जाणार असल्याची माहिती Google नं ट्विटरद्वारे दिली. तसंच तुम्हाला हवं असल्यास तुम्ही २४ तासही व्हिडीओ कॉल करू शकता.
मागील वर्षी गुगलने आपल्या व्हिडीओ कॉलिंग सेवेचे नाव गुगल हँगआउट वरून Google Meet असं केलं होतं. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने जीमेलच्या सर्व वापरकर्त्यांसाठी ही व्हिडिओ कॉलिंग सेवा विनामूल्य देण्याचा कंपनीनं निर्णय घेतला होता. तर यापूर्वी गुगलनं गुगल मीट सेवा ही मार्च २०२१ पर्यंत विनामूल्य देण्याची घोषणा केली होती. परंतु आता ही सेवा जूनपर्यंत ही सेवा मोफत ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आयओएस आणि अँड्रॉईडस्मार्टफोन वापरत असलेले युझर्स गुगल मीट विनामूल्य वापरु शकतात. Google मीटद्वारे कॉलवर जास्तीत जास्त ४९ जण जोडले जाऊ शकतात. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, Google ने व्हिडीओ कॉलिंग वैशिष्ट्यांसह Gmail अधिक आकर्षक बनविण्यासाठी Google मीट तयार केलं होतं.