जबरदस्त स्पीड मिळणार! मस्क यांची स्टारलिंक २०२४ पासून डायरेक्ट टू हॅन्डसेट इंटरनेट सेवा देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 10:13 AM2023-10-16T10:13:17+5:302023-10-16T10:14:33+5:30

उद्योगपती इलॉन मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी लवकरच भारताता आपले सेवा सुरू करणार आहे.

Get great speed! Musk's company Starlink will provide direct home internet service from 2024 | जबरदस्त स्पीड मिळणार! मस्क यांची स्टारलिंक २०२४ पासून डायरेक्ट टू हॅन्डसेट इंटरनेट सेवा देणार

जबरदस्त स्पीड मिळणार! मस्क यांची स्टारलिंक २०२४ पासून डायरेक्ट टू हॅन्डसेट इंटरनेट सेवा देणार

अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क लवकरच आपला ड्रीम प्रोजेक्ट भारतात सुरू करणार आहेत. स्टारलिंकद्वारे आता भारतात इंटरनेट सेवा मिळणार आहे. कंपनी २०२४ पासून डायरेक्ट टू हॅन्डसेट सेवा सुरू करणार आहे.  D2H सेवेद्वारे, तुम्ही कुठेही इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकता. एका अहवालानुसार, कंपनीने सांगितले की, त्यांची डायरेक्ट टू सेल सेवा इंटरनेट ऑफ थिंग्ज उपकरणांना "सामान्य एलटीई स्टॅन्डर्स देखील जोडेले आहेत.

हमासच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्या धाडसी कन्येला वीरमरण; इस्रायल बॉर्डरवर होती तैनात

इलॉन मस्क यांच्या SpaceX या कंपनीने २०२४ मध्ये मजकूर सेवा आणि त्यानंतर २०२५ मध्ये व्हॉइस आणि डेटा तसेच IoT सेवा आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्यांना इंटरनेट ऑफ थिंग्ज म्हणजे काय हे माहीत नाही त्यांच्यासाठी तंत्रज्ञान, सेन्सर्स आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो. IOT द्वारे, इंटरनेटच्या मदतीने डिव्हाइसेसमध्ये प्रवेश आणि नियंत्रण केले जाऊ शकते.

स्टारलिंकची टेक्स्ट आणि व्हॉईस सेवा अगोदर कुठे सुरू होणार आहे याची अजुनही माहिती समोर आलेली नाही, तसेच त्याची किंमत काय असेल  हे सध्यातरी समोर आलेले नाही. चांगली गोष्ट म्हणजे डायरेक्ट टू होम सर्व्हिसेससाठी हार्डवेअर, फर्मवेअर किंवा विशेष ऍप्लिकेशन्समध्ये कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही आणि तुम्ही मजकूर, व्हॉइस आणि डेटाचा सहज आनंद घेऊ शकाल. याचा अर्थ असा की जे लोक आधीच कंपनीची सॅटेलाइट इंटरनेट सेवा वापरत आहेत ते जुन्या हार्डवेअरवर D2H चा लाभ घेऊ शकतील.

स्टारलिंकने सांगितले की, सॅटेलाईटमध्ये डायरेक्ट-टू-सेल क्षमता आहे, त्यात "प्रगत eNodeB मॉडेम" ऑनबोर्ड आहे, जो अंतराळातील मोबाइल टॉवरप्रमाणे काम करतो आणि नेटवर्क एकत्रीकरण प्रदान करतो.

Web Title: Get great speed! Musk's company Starlink will provide direct home internet service from 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.