सोलार पॉवरवर चालणारं स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळणार जबरदस्त आणि प्रीमिअम फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 05:09 PM2022-07-02T17:09:20+5:302022-07-02T17:10:09+5:30

गार्मिननं भारतात दोन नवीन आणि प्रीमिअम स्मार्टवॉच सीरिज लाँच केली आहे. नव्या स्मार्टवॉचमध्ये कंपनीनं सोलार चार्जिंग सपोर्टही दिला आहे.

Garmin launches solar powered Forerunner 955 Solar smartwatch Check price specifications | सोलार पॉवरवर चालणारं स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळणार जबरदस्त आणि प्रीमिअम फीचर्स

सोलार पॉवरवर चालणारं स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळणार जबरदस्त आणि प्रीमिअम फीचर्स

Next

स्मार्टवॉचची क्रेझ असलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. सुप्रसिद्ध कंपनी Garmin ने आपली नवीन स्मार्टवॉच सीरिज Forerunner 955 आणि Forerunner 255 भारतात लाँच केली आहे. Forerunner 955 सीरिजमध्ये दोन स्मार्टवॉच आहेत आणि ती म्हणजे Forerunner 955 आणि Forerunner 955 Solar. त्याच वेळी, Forerunner 255 अंतर्गत, गार्मिनने Forerunner 255 आणि Forerunner 255S लाँच केले आहेत. सोलार पॉवर मॉडेलसह येणार्‍या Forerunner 955 सीरिजच्या सुरुवातीची किंमत 53,490 रुपये आहे. दुसरीकडे, Forerunner 255 ची सुरुवातीची किंमत 37,490 रुपये आहे.

फोररनर 955 सीरिजचे फीचर्स
कंपनी वॉचमध्ये 360*360 पिक्सेल रिझॉल्युशनसह 1.3 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास डीएक्स प्रोटक्शनसोबत येतो. यामध्ये देण्यात आलेल्या फीचर्सना सहजरित्या अॅक्सेस करता यावं यासाठी कंपनीनं यात 5 बटन दिले आहेत. यात नोटिफिकेशनशिवाय म्युझिक सपोर्ट, रेस मॅट्रिक्स आणि रिअल टाईम स्टॅमिना इन्फॉर्मेशनची माहिती मिळते. कनेक्टिव्हीटीसाठी यात गार्मिन पे, गार्मिन कनेक्ट, जीपीएस, मल्टी फ्रिक्वेन्सी पोझिशनिंग, ब्लुटूथ, एएनटी प्लस आणि वायफायसारखे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. ही जगातील पहिले सोलर चार्जिंग सपोर्ट करणारे जीपीएस स्मार्टवॉच आहे.

फोररनर 255 सीरिजचे फीचर्स
या सीरिजमध्ये कंपनी 260x260 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.3-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देत आहे. त्याच वेळी, या सीरिजच्या एस मॉडेलमध्ये, तुम्हाला 1.1-इंचाचा टचस्क्रीन पाहायला मिळेल. स्मार्टवॉचमध्ये डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कंपनी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देखील देत आहे. कंपनीच्या या अत्याधुनिक स्मार्टवॉचची खासियत म्हणजे त्यांत 4 जीबी रॅमसह रेस आणि पेस प्रो विजेट, लाइव्ह ट्रॅकिंगची सुविधाही मिळते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय, आघाडीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून स्मार्ट घड्याळे खरेदी करता येतात.

Web Title: Garmin launches solar powered Forerunner 955 Solar smartwatch Check price specifications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.