भन्नाट! 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 50-इंचाचा Smart TV आणा घरी; एकदा पाहाच ऑफर  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 07:41 PM2022-04-16T19:41:26+5:302022-04-16T19:41:34+5:30

Flipkart TV Days सेलमध्ये 50-इंचाचा Smart TV तुम्ही 41 हजार रुपयांच्या ऐवजी 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.

Flipkart TV Days Buy 50 Inch Thomson Oathpro Smart Android TV With Huge Discount   | भन्नाट! 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 50-इंचाचा Smart TV आणा घरी; एकदा पाहाच ऑफर  

भन्नाट! 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 50-इंचाचा Smart TV आणा घरी; एकदा पाहाच ऑफर  

googlenewsNext

Flipkart वर 15 एप्रिलपासून Flipkart TV Days सेल सुरु आहे. हा सेल 5 दिवस चालणार असून 19 एप्रिलला याचा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही नवीन टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर इथे सॅमसंग, शाओमी, वनप्लस, रियलमी, कोडॅक आणि थॉम्पसन या लोकप्रिय ब्रँड्सच्या टीव्ही मॉडेल्सवर भरघोस सूट दिली जात आहे. या सेलमध्ये एक 50-इंचाचा स्मार्ट टीव्ही तुम्ही 9 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता.  

अशी आहे ऑफर 

ही ऑफर Thomson OATHPRO Series 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV या मॉडेलवर उपलब्ध आहे. या टीव्हीची मूळ किंमत 40,999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 31% डिस्काउंट नंतर हा टीव्ही तुम्ही 27,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. जी एक चांगली डील आहे. परंतु तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करून 1,250 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता.  

कॅशबॅकनंतर या टीव्हीची किंमत 26,749 रुपये होईल. ही किंमत देखील एक्सचेंज ऑफरनं आणखी कमी करता येईल. इथे तुम्ही तुमचा जुना टीव्ही देऊन 18 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. योग्य मॉडेल एक्सचेंज केल्यास 40,999 रुपयांचा नवाकोरा टीव्ही फक्त 8,749 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

स्पेसिफिकेशन्स  

Thomson OATHPRO Series 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV वर तुम्ही नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम आणि युट्युब, अशा ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा आस्वाद घेऊ शकता. हा अँड्रॉइड टीव्ही असल्यामुळे गुगल असिस्टंट आणि क्रोम कास्ट फीचर्स बिल्ट इन मिळतात. हा 50-इंचाचा टीव्ही अल्ट्रा एचडी 4K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 60Hz रिफ्रेश रेट स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही 30W साऊंड आउटपुट देतो.  

Web Title: Flipkart TV Days Buy 50 Inch Thomson Oathpro Smart Android TV With Huge Discount  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.