Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 23:42 IST2026-01-01T23:41:21+5:302026-01-01T23:42:14+5:30
Google Pixel 10: नवीन वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
नवीन वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ई-कॉमर्स बेवसाईट फ्लिपकार्टवर गुगल पिक्सेल १० मोठ्या सवलतीसह उपलब्ध झाला आहे. शिवाय, हा फोन ईएमआयवर देखील खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गुगलचा हा फ्लॅगशिप फोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो.
फ्लिपकार्टवर गुगल पिक्सेलची किंमत ७४ हजार ९९९ रुपये आहे. एचडीएफसी बँक कार्डने हा फोन खरेदी केल्यास तुम्हाला ₹५,००० ची सूट मिळेल. याव्यतिरिक्त, तुम्ही इतर बँक कार्ड ऑफरवर ₹५,००० पर्यंत सूट मिळवू शकता. त्यामुळे या फोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये होते. या फोनच्या खरेदीवर एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. परंतु, ही किंमत ग्राहकांच्या जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेलवर अवलंबून असेल.
गुगल पिक्सेल १०: फिचर्स
या फ्लॅगशिप फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह ६.३-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ४ हजार ९७० एमएएच बॅटरी मिळते, जी ३० वॅट वायर्ड आणि १५ वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ४८ मेगापिक्सेलचा मुख्य वाइड-अँगल कॅमेरा, १३ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि १०.८ मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा मिळतो. तर, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १०.५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १६ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.