Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:36 IST2025-10-06T16:34:03+5:302025-10-06T16:36:15+5:30
Flipkart Pre-Reserve Pass News: फ्लिपकार्टवर त्यांच्या बहुप्रतिक्षित 'बिग बिलियन डेज' सेलमध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
वॉलमार्टच्या मालकीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर त्यांच्या बहुप्रतिक्षित 'बिग बिलियन डेज' सेलमध्ये ग्राहकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप होत आहे. कंपनीने सेलच्या काही दिवस आधी ५ हजार रुपयांत 'प्री-रिझर्व्ह पास' विकले होते. या पासची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 'आयफोन १६ प्रो' मोठ्या सवलतीत मिळेल, असे आश्वासन कंपनीने दिले. मात्र, अनेक ग्राहकांना आयफोन मिळाला नाही आणि त्यांचे ५ हजार रुपयेही कंपनीने परत केले नाहीत, असा दावा ग्राहक करत आहेत.
प्री-रिझर्व्ह पास खरेदी करूनही 'आयफोन १६ प्रो' (१२८ जीबी) सवलतीच्या दरात मिळाला नाही, अशी तक्रार अनेक वापरकर्ते एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करत आहेत. अभिषेक यादव नावाच्या एका एक्स वापरकर्त्याने पोस्टमध्ये लिहिले की, त्याला प्री-रिझर्व्ह पास खरेदी करूनही आयफोन मिळाला नाही आणि त्याचे ५ हजार रुपये गमावले आहेत. कंपनीने कमी किमतीत आयफोन १६ प्रो चे मर्यादित युनिट्स विकले, पण ज्यांना तो मिळाला नाही, त्यांना पैसे परत करण्यात आले नाहीत.
Many users pre-booked the iPhone 16 Pro before Flipkart’s Big Billion Days sale. Some couldn’t complete their purchase due to limited stock, while others faced cancellations for unclear reasons. A few even had their orders shipped to the nearest hub and then cancelled. This ended… pic.twitter.com/fmN9sAcw4P
— Abhishek Yadav (@yabhishekhd) October 5, 2025
कंपनीचे नियम आणि अटी काय सांगतात?
फ्लिपकार्टने त्यांच्या विक्रीच्या अटी आणि शर्तींमध्ये स्पष्ट केले होते की, हा ५ हजार रुपयांचा प्री-रिझर्व्ह पास रिफंडेबल नाही. कंपनीच्या नियमांनुसार, जर ग्राहक पहिल्या ४८ तासांमध्ये 'आयफोन प्रो' (१२८ जीबी) खरेदी करू शकला नाही. तर, पास आपोआप रद्द होईल आणि पैसे परत केले जाणार नाहीत.
I ordered an iPhone 16 Pro 128GB during the #BigBillionDays sale on Sept 22 using Flipkart’s Pre-Reserve Pass worth ₹5000 (non-refundable). Flipkart guaranteed priority delivery with this pass. But here’s what actually happened 👇 pic.twitter.com/Qclgl2fWpR
— random_guy (@Crickfreak_007) October 4, 2025
फ्लिपकार्टवर अन्याय्य नफा कमावल्याचा आरोप
जर ग्राहक सवलतीच्या दरात आयफोन खरेदी करू शकला नाही, तर कंपनीने ५ हजार रुपयांचा प्री-पास परत करणे किंवा ग्राहकाला दुसऱ्या उत्पादनाच्या खरेदीसाठी सवलत कायम ठेवणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीने तसे केले नाही. परिणामी, ज्या ग्राहकांना 'आयफोन १६ प्रो' मिळाला नाही, त्यांचे प्रत्येकी ५ हजार रुपयांचे नुकसान झाले आणि फ्लिपकार्टने यातून मोठा 'अन्याय्य नफा' कमावल्याचा आरोप ग्राहक करत आहेत.
@Flipkart@flipkartsupport My iPhone 16 Pro order was supposed to arrive on Oct 2nd, but I've heard nothing. Can you please look into this?
— Krishna Pratap🇮🇳 (@imkrishnapratap) October 5, 2025
Also not getting proper response from customer support executive@yabhishekhd sir please support#DelayedDeliverypic.twitter.com/y1VyJ5Kubo
फ्लिपकार्टविरुद्ध ग्राहक न्यायालयात जाणार?
लाखो वापरकर्त्यांनी हा पास खरेदी केला असण्याची शक्यता आहे. परंतु, प्रत्यक्षात किती जणांना सवलतीत आयफोन १६ प्रो मिळाला. हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. एक्सवरील बहुतांश तक्रारींवरून असे दिसते की, मोठ्या संख्येने ग्राहकांना आयफोन मिळाला नाही. संतप्त झालेले अनेक वापरकर्ते आता फ्लिपकार्टविरुद्ध ग्राहक न्यायालयात खटला दाखल करण्याबद्दल चर्चा करत आहेत, कारण हजारो ग्राहकांचे ५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा त्यांचा दावा आहे.