फेसबुकवर लवकरच येणार बहुप्रतीक्षित डिसलाइक बटण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 12:32 IST2018-05-02T12:32:48+5:302018-05-02T12:32:48+5:30

facebook starts testing dislike button on posts | फेसबुकवर लवकरच येणार बहुप्रतीक्षित डिसलाइक बटण

फेसबुकवर लवकरच येणार बहुप्रतीक्षित डिसलाइक बटण

मुंबई- फेसबुकवर लवकरच डिसलाइक फीचर येणार असल्याची माहिती आहे. फेसबुककडून डिसलाइक बटण टेस्टिंग सुरू झाली आहे. फेसबुकवरील लाइक बटनबरोबरच डिसलाइक बटणची मागणी युजर्सकडून वारंवार होत होती. या मागणीनंतर फेसबुककडून डिसलाइक बटन आणण्याची तयारी सुरू झाली आहे. पण हे नवं फीचर वेगळ्या प्रकारे सादर केलं जाऊ शकतं. 

फेसबुकवर येणारं डिसलाइक बटण डाऊनवोटप्रमाणे काम करणार असल्याचं बोललं जात आहे. लाइक बटण ज्याप्रमाणे अपसाइड थंब असतं त्याप्रमाणे डिसलाइक बटण डाऊनसाइड थंब असेल अशी शक्यता होती. पण त्याऐवजी आता एका बाणाच्या आकाराचं बटन असेल, असं बोललं जात आहे. फेसबुकचं हे नवं बटण सध्या फक्त न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहे. 

फेसबुकवरील हे बटण नेटिझन्सच्या आक्षेपार्ह कमेन्टसाठी आहे. सोशल मीडियावर लोक याचा वापर करून एखादी आक्षेपार्ह पोस्ट डिसलाइक करू शकता. फेसबुकवर डिसलाइक बटन आणण्यासाठी फेसबुक 2015पासून संघर्ष करतं आहे. 
 

Web Title: facebook starts testing dislike button on posts