Facebook चा नवा 'लोगो' पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 10:09 AM2019-11-06T10:09:24+5:302019-11-06T10:17:08+5:30

फेसबुकने एक नवीन लोगो लाँच केला आहे. एका खास उद्देशाने कंपनीने हा नवा लोगो लाँच केला आहे.

Facebook Now Has a New Logo to Set it Apart From Instagram And WhatsApp | Facebook चा नवा 'लोगो' पाहिलात का?

Facebook चा नवा 'लोगो' पाहिलात का?

Next
ठळक मुद्देफेसबुकने एक नवीन लोगो लाँच केला आहे. एका खास उद्देशाने कंपनीने हा नवा लोगो लाँच केला आहे. नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे.निळा रंग हा फेसबुकसाठी, हिरवा रंग व्हॉट्सअ‍ॅपसाठी आणि गुलाबी रंग इन्स्टाग्रामसाठी देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - संवाद साधण्यासाठी फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने एक नवीन लोगो लाँच केला आहे. एका खास उद्देशाने कंपनीने हा नवा लोगो लाँच केला आहे. फेसबुकच्या या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्लिश अक्षरं ही कॅपिटलमध्ये दिसणार आहेत. मात्र हा बदललेला लोगो फेसबुक अ‍ॅप किंवा फेसबुक वेबवर दिसणार नाही. 

नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे. फ्लॅट FACEBOOK हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिण्यात आले आहे. हा लोगो वेगवेगळ्या रंगात असून फेसबुकच्या इतर प्रोडक्टला दर्शवत असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामची पॅरेंट कंपनी म्हणून हा स्वतः चा नवा लोगो प्रसिद्ध केला असल्याची माहिती मिळत आहे. फेसबुकच्या अंतर्गत फेसबुक अ‍ॅप, मॅसेंजर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, ओकुलस, वर्कप्लेस, पोर्टल आणि कॅलिब्रा यांचा समावेश होतो. 

निळा रंग हा फेसबुकसाठी, हिरवा रंग व्हॉट्सअ‍ॅपसाठी आणि गुलाबी रंग इन्स्टाग्रामसाठी देण्यात आला आहे. एका रिपोर्टनुसार फेसबुकचा नवा लोगो काही आठवड्यातच युजर्सना पाहायला मिळणार आहे. नवा लोगो कंपनीला फेसबुक अ‍ॅपच्या माध्यमातून वेगळी ओळख देणार आहे. कंपनी मार्केटिंग आणि प्रोडक्ट्ससाठी हा वापरणार आहे. युजर्सना माहीत असावे ते नेमके कोणत्या कंपनीची सेवा वापरत आहेत हे समजण्यासाठी लोगो बदलण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

फेसबुकच्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहीत आहेत का? 

मस्तच! न्यूजसाठी वेगळं सेक्शन लाँच करणार फेसबुक

फेसबुक लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन सर्व्हिस सुरू करणार आहे. युजर्सना आता फेसबुकवर नवा न्यूज सेक्शन मिळणार आहे. या न्यूज सेक्शनच्या माध्यमातून जगाभरातील सर्व बातम्या या युजर्सना पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकमध्ये लवकरच एक न्यूज टॅबचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. न्यूज सेक्शन या नव्या सर्व्हिससाठी फेसबुक न्यूज प्रोव्हाईड करणाऱ्या वेबसाईट आणि एजन्सीसोबत चर्चा करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरून न्यूज सेक्शन सुरू करण्यासाठी प्रमुख मीडिया हाऊसशी चर्चा सुरू केली आहे. यामध्ये न्यूयॉर्क पोस्ट, वॉशिंग्टन पोस्ट, समाचार कॉर्प सारख्या मीडिया हाऊस आणि पब्लिकेशन्स आहेत.

Facebook to hide number of likes in trial aimed at improving users

फेसबुकवर पोस्ट अथवा फोटोला कमी लाईक्स मिळाले की अनेकजण निराश होतात. मात्र आता या नव्या फीचरमुळे अनेकांना फायदा होणार आहे. तसेच कमी लाईक्स मिळतात म्हणून अनेक लोक फेसबुकवर पोस्ट करायला घाबरतात किंवा केलेली पोस्ट काही वेळाने डिलीट करत असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. त्यामुळेच फेसबुकने पोस्ट आणि फोटोवरील लाईक्स हाईड करण्याचा विचार केला आहे. 

फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने भारतात आपले म्युझिक प्रोडक्ट्स लॉन्च केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, म्युझिक प्रोडक्ट्सच्या मदतीने युजर्स गाण्याच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करू शकतात. तसेच फेसबुक प्रोफाईल आणि स्टोरीमध्येही यामुळे आवडतं गाणं ऐकवता येणार आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये म्युझिक स्टिकर, लिरिक्स, लिप सिंक लाईव्ह सारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रोडक्ट्सच्या मदतीने युजर्स बॉलिवूडची लोकप्रिय गाणी फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये वापरू शकतात. फेसबुकचं हे प्रोडक्ट 55 देशांमध्ये उपलब्ध आहे. फेसबुक इंडियाचे डायरेक्टर आणि पार्टनरशिप हेड मनीष यांनी दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना प्लॅटफॉर्मवर गाण्यांच्या माध्यमातून अनेकांशी कनेक्ट होता येईल तसेच आपल्या भावना व्यक्त करता येतील हा कंपनीचा यामागे उद्देश आहे.


 

Web Title: Facebook Now Has a New Logo to Set it Apart From Instagram And WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.