Facebook, Instagram Down: Difficulties logging in users | Facebook, Instagram Down: फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन; युजर्संना लॉग इन करताना अडचणी

Facebook, Instagram Down: फेसबुक, इन्स्टाग्राम डाऊन; युजर्संना लॉग इन करताना अडचणी

जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम गुरुवारी रात्री उशिरा डाऊन झाले. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लॉग इन करताना अडचणी आल्या. तसेच, युजर्संना फोटो, व्हिडीओ आणि न्यूज फीड लोड करतेवेळी ही समस्या येत होती.

डाऊन डेक्टरच्या माहितीनुसार, ही तांत्रिक समस्या गुरूवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. भारतासह जगभरातील युजर्संना अँड्राईड आणि आयओएसवर इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरताना समस्या आली. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर रीफ्रेश केल्यानंतर पेस ओपन होण्यास वेळ लागत होता. तसेच, यावर वेबसाइट्स लोड करण्याचा प्रयत्न करीत असताना, एरर संदेश दिसत असल्याच्या तक्रारी युजर्संनी केल्या आहेत.

कंपनीकडून ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र,  दोन्ही सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म डाऊन झाल्यानंतर ट्विटरसह इतर सोशल मीडियावर यासंदर्भातील मीम्सचा वर्षाव सुरु झाला. यावेळी युजर्संनी अनेक विनोदी मीम्स पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. युजर्स यानंतर सध्या ट्विटरवर तक्रार करत असल्याने #FacebookDown आणि #InstagramDown ट्रेंड होत आहेत.
इन्स्टाग्रामच्या जवळजवळ 5000 हून अधिक युजर्संनी ही समस्या नोंदवली आहे, तर साधारण 224 युजर्संनी फेसबुकवर फीड लोड होत नसल्याचे सांगितले आहे.

Web Title: Facebook, Instagram Down: Difficulties logging in users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.