AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:12 IST2026-04-05T14:09:23+5:302026-04-05T14:12:44+5:30

Tech Layoffs: २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांतच ५० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या.

Employee layoffs continue in the name of AI! From Oracle, Amazon to Meta...Thousands of employees have been laid off so far in 2026 | AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ

AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ

Tech Layoffs: २०२६ च्या सुरुवातीला जागतिक टेक उद्योगात मोठ्या प्रमाणात नोकरकपातीची लाट आली आहे. Oracle, Meta, Amazon यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांतच तब्बल ५१ हजारांहून अधिक नोकऱ्या कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपन्या खर्च कमी करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असल्यामुळे हा बदल होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Oracle ची सर्वात मोठी नोकरकपात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Oracle ने ३१ मार्च रोजी आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या नोकरकपातींपैकी एक केली. कंपनीने सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे १८ टक्के आहेत. ही नोकरकपात अमेरिका, भारत, कॅनडा आणि मेक्सिकोसह अनेक देशांमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे, भारतातील तब्बल १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. या निर्णयामुळे कंपनीला दरवर्षी ८ ते १० अब्ज डॉलर्सची बचत होणार असून, ही रक्कम AI डेटा सेंटर आणि हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सिस्टममध्ये गुंतवली जाणार आहे.

Meta चा ‘Year of Efficiency’ प्लॅन

Meta ने CEO मार्क झुकरबर्ग यांच्या ‘Year of Efficiency’ योजनेअंतर्गत नोकरकपात केली आहे. Reality Labs, Facebook, सेल्स आणि रिक्रूटिंग विभागांमध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. Meta आता Llama सारख्या AI मॉडेल्स आणि मोठ्या डेटा सेंटर प्रोजेक्ट्सवर मोठी गुंतवणूक करत आहे. कंपनीचा भर आता कमी कर्मचाऱ्यांसह अधिक तंत्रज्ञान आधारित कामावर आहे.

Amazon आणि Atlassian ची रणनीती

Amazon ने जानेवारीमध्ये सुमारे १६ हजार नोकऱ्या कमी केल्या, जी अलीकडील काळातील मोठ्या नोकरकपातींपैकी एक मानली जाते. Alexa आणि फिजिकल रिटेल सारख्या कमी कामगिरी करणाऱ्या विभागांमध्ये ही कपात करण्यात आली. कंपनी आता AWS आणि AI क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. Atlassian कंपनीने मार्च महिन्यात सुमारे १,६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, जे कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या सुमारे १० टक्के आहेत. कंपनीने सांगितले की या बचतीचा वापर AI रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये केला जाणार आहे.

Block Inc चा धक्कादायक निर्णय

Block Inc कंपनीने फेब्रुवारीमध्ये सुमारे ४,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, जे कंपनीच्या एकूण वर्कफोर्सच्या सुमारे ४० ते ५० टक्के होते. कंपनीचे CEO जॅक डोर्सी यांनी AI मुळे ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम होत असल्याचे कारण दिले. मात्र नंतर काही कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याची बातमी समोर आली, ज्यामुळे AI मुळे कंपन्यांची रणनीती सतत बदलत असल्याचे दिसून येते.

AI मुळे बदलतेय नोकरीचे स्वरूप

२०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत १०० पेक्षा जास्त नोकरकपातीच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वाधिक परिणाम अमेरिकेत झाला असून, ३२ हजारांहून अधिक नोकऱ्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्येही त्याचा परिणाम दिसून आला आहे. फिनटेक, ई-कॉमर्स आणि एंटरप्राइज सॉफ्टवेअर क्षेत्रावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. कंपन्या AI-आधारित भविष्यासाठी हे निर्णय आवश्यक असल्याचे सांगत आहेत. मात्र टीकाकारांचे म्हणणे आहे की कंपन्या नफा कमावत असूनही मध्यम स्तरातील कर्मचाऱ्यांना कमी करून AI टूल्सचा वापर वाढवत आहेत, त्यामुळे नोकरीच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
 

Web Title : एआई के नाम पर छंटनी: ओरेकल, अमेज़ॅन, मेटा ने हजारों नौकरियां घटाईं

Web Summary : ओरेकल, मेटा और अमेज़ॅन जैसी टेक कंपनियों ने एआई निवेश का हवाला देते हुए हजारों कर्मचारियों की छंटनी की। 2026 की शुरुआत में 51,000 से अधिक नौकरियाँ कम हुईं। कंपनियाँ मुनाफे के बीच एआई को प्राथमिकता दे रही हैं, जिससे नौकरी की सुरक्षा प्रभावित हो रही है।

Web Title : AI-Driven Layoffs Surge: Oracle, Amazon, Meta Slash Thousands of Jobs

Web Summary : Tech giants like Oracle, Meta, and Amazon are laying off thousands, citing AI investments. Over 51,000 jobs cut in early 2026. Companies prioritize AI, impacting job security amid rising profits.