एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:56 IST2025-06-02T16:55:48+5:302025-06-02T16:56:04+5:30

एक्स चॅटनमध्ये तुम्हाला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, ऑटो डिलीट मेसेजेस आणि कोणत्याही प्रकारच्या फाइल्स पाठवण्याचे पर्याय मिळणार आहेत.

Elon musk X has taken the plunge! New messaging feature XChat launched; Audio, video calls will also be available like whats app | एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...

एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...

अनेक लिमिटेशनमुळे माघारलेल्या ट्विटरला आपल्या मालकीचे करत पोस्टचे टेक्स्ट वाढविण्यापासून ते चिमनी काढून त्याजागी एक्स टाकण्यापर्यंत एलन मस्कनी खूप बदल केले आहेत. आता त्यांनी फेसबुक, व्हॉट्सअपला टक्कर देण्यासाठी नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले आहे. 

एक्स चॅटनमध्ये तुम्हाला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन, ऑटो डिलीट मेसेजेस आणि कोणत्याही प्रकारच्या फाइल्स पाठवण्याचे पर्याय मिळणार आहेत. सध्या हे बीटा व्हर्जन असून काही रिजनमध्ये ते देण्यात येत आहे. एक्सचॅट सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे व ते काही युजरना वापरता येणार आहे. अद्याप ते सर्वसामान्यांसाठी कधी रिलीज केले जाईल याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. 

अब्जाधीश एलन मस्क यांनी रविवारी यासंबंधी पोस्ट करत माहिती दिली आहे. मस्क यांच्या दाव्यानुसार एक्स चॅटमध्ये बिटकॉइन-शैलीतील एन्क्रिप्शन कोडिंग वापरण्यात आले आहे. एक्सचॅटवरून युजर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल देखील करू शकणार आहेत. महत्वाचे म्हणजे यासाठी मोबाईल नंबर लिंक करण्याची गरज ठेवलेली नाही.

व्हॉट्सअॅपमध्ये उपलब्ध असलेली सर्व वैशिष्ट्ये एक्सचॅटमध्ये देण्यात आली आहेत. पाठवणारा आणि प्राप्तकर्ता यांच्यामध्ये सुरक्षितपणे डेटा पोहोचविण्यासाठी एंड टू एंड एन्क्रिप्शन सुरक्षा प्रणाली यात वापरण्यात आली आहे. म्हणजेच मध्येच कोणीही ती माहिती मिळवू शकणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याला संदेश पाठवता तेव्हा तो संदेश तुमच्या डिव्हाइसवर एन्क्रिप्ट केला जातो. तो पुढे पाठवून एंड युजरकडे तो डिक्रीप्ट केला जातो. यामुळे तो मध्येच डीकोड करणे शक्य होत नाही. 

Web Title: Elon musk X has taken the plunge! New messaging feature XChat launched; Audio, video calls will also be available like whats app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.