एलॉन मस्क यांची 'विकीपीडिया'ला एक अब्ज डॉलर्सची 'ऑफर', ठेवली फक्त एक अट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 05:20 PM2023-10-23T17:20:13+5:302023-10-23T17:21:43+5:30

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी विकिपीडियावर निशाणा साधला आहे

Elon musk offers one billion dollar deal to Wikipedia with condition of change of name | एलॉन मस्क यांची 'विकीपीडिया'ला एक अब्ज डॉलर्सची 'ऑफर', ठेवली फक्त एक अट

एलॉन मस्क यांची 'विकीपीडिया'ला एक अब्ज डॉलर्सची 'ऑफर', ठेवली फक्त एक अट

Elon Musk, Wikipedia: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे, त्यांचे आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यात अनेक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू होते. यावेळी त्यांचे लक्ष्य ऑनलाइन नॉन-प्रॉफिट एनसायक्लोपीडिया विकिपीडिया आहे. त्यांचे म्हणणे आहे की विकिपीडियाने त्यांचे नाव बदलल्यास ते त्याला एक अब्ज डॉलर्स देतील. टेस्ला आणि 'स्पेसएक्स'चे मालक मस्क यांनी या वर्षी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतली आणि त्याचे नाव बदलून 'एक्स' केले. याशिवाय त्यांनी त्यात अनेक बदलही केले. ब्लूमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार, मस्क $204 अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'विकिपीडियाने त्यांचे नाव बदलून डिकिपीडिया केले तर मी त्यांना एक अब्ज डॉलर्स देईन.' यावर एका यूजरने विकिपीडियाचे नाव बदलण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की, पैसे मिळताच तुम्ही तुमचे जुने नाव परत वापरा. त्यावर मस्क यांनी एक अट घातली. मस्क म्हणाले की, 'मी वेडा नाही. विकिपीडियाला किमान वर्षभर तरी त्या नव्या नावासह इंटरनेटवर अस्तित्व ठेवावे लागेल. इतकंच नाही तर मस्कने आणखी एका ट्विटमध्ये विकिपीडियाच्या होमपेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये विकिपीडियाचे सहसंस्थापक जिमी वेल्स यांच्या वतीने 'विकिपीडिया विक्रीसाठी नाही' असे आवाहन करण्यात आले आहे.

मस्क म्हणाले, 'विकिपिडिया फाऊंडेशनला इतके पैसे का हवे आहेत, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? विकिपीडिया ऑपरेट करण्यासाठी त्याची गरज नाही. लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही जर तुमच्या फोनने काहीही लिहू शकता, मग तुम्हाला पैशांची गरज काय? या वर्षी मे महिन्यात वेल्स यांनी मस्क यांच्यावर टीका केली होती. तुर्कीमध्ये अध्यक्षीय निवडणुकीच्या एक दिवस आधी ट्विटरने रिसेप तय्यप एर्दोगान वरील टीका सेन्सॉर केल्याचा आरोप वेल्स यांनी केला होता. दोन वर्षांपूर्वी तुर्कीमध्ये विकिपीडियावर बंदी घालण्यात आली होती. त्याच वादाचा दुसरा अंक आता दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Elon musk offers one billion dollar deal to Wikipedia with condition of change of name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.