AIच्या एक पाऊल पुढे! मस्कच्या कंपनीने थेट मानवी मेंदूतच लावली मायक्रोचिप; अशी करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:48 AM2024-01-30T11:48:19+5:302024-01-30T11:49:29+5:30

न्यूरालिंक या कंपनीने हा प्रयोग केला आहे, जाणून घ्या त्याबाबत सविस्तर

Elon musk Neuralink company implants brain chip in human check how it works explains Elon Musk | AIच्या एक पाऊल पुढे! मस्कच्या कंपनीने थेट मानवी मेंदूतच लावली मायक्रोचिप; अशी करणार काम

AIच्या एक पाऊल पुढे! मस्कच्या कंपनीने थेट मानवी मेंदूतच लावली मायक्रोचिप; अशी करणार काम

Neuralink Brain Chip Elon Musk : रोबोटिक्सच्या नंतर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवा ट्रेंड तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिसून येत आहे. पण ही बाब AI वरच थांबलेली नाही. तर आता तंत्रज्ञानाची पातळी आणखीन उंचावली जाणार आहे. थेट मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्यात आली आहे. या मुद्द्यावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत होती. पण आता मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X आणि टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर हा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे.

पोस्ट शेअर करून इलन मस्कने म्हटले आहे की न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनी न्यूरालिंकने पहिल्यांदाच मानवी मेंदूमध्ये चिप बसवली आहे. मस्कच्या पोस्टनुसार, ज्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये चीप लावण्यात आली आहे, ती व्यक्ती हळूहळू बरी होत आहे आणि सुरुवातीचे परिणाम खूपच आशादायक आहेत. रिपोर्ट्सनुसार, मानवी मेंदूमध्ये बसवलेल्या चिपचा आकार पाच नाण्यांएवढा आहे.

मस्क यांनी न्यूरालिंकच्या पहिल्या उत्पादनाला टेलिपथी (Telepathy) असे नाव दिले आहे. इलन मस्कने हे स्टार्ट-अप २०१६ मध्ये सुरू केल्याचे सांगितले जाते. गेल्या वर्षी यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर, मस्कच्या स्टार्ट-अप कंपनीने मेंदूमध्ये चिप बसवण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती.

ही चिप आणण्याचे प्रयोजन काय?

ही स्मार्ट चिप आणण्यामागचा उद्देश अशा लोकांना मदत करणे आहे जे चालू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत किंवा आपण असक्षम आहोत असे त्यांचे म्हणणे आहे. अशा लोकांना चांगले जीवन देण्याच्या उद्देशाने या चिपवर काम केले जात आहे.

तंत्रज्ञान कसे कार्य करते?

इलन मस्क यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की चिप इम्प्लांट मेंदूला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाशी कसे जोडते. मस्क सांगतात की, इम्प्लांट शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते. न्यूरोटेक्नॉलॉजी कंपनीचे उद्दिष्ट मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संवादाचे माध्यम तयार करणे हे आहे.

या तंत्रज्ञानाच्या आगमनानंतर आता प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे की अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य आहे का? तंत्रज्ञान ज्या पद्धतीने काम करायचे आहे, त्या ऐवजी रिव्हर्स ॲक्शन मोडमध्ये काम करू लागले तर काय होईल? गोष्टी आणखी वाईट होऊ शकतात का? असे विविध प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.

Web Title: Elon musk Neuralink company implants brain chip in human check how it works explains Elon Musk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.