शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
3
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
4
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
5
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
6
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
7
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
8
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
9
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
10
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
11
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
12
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
13
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
14
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

Dell Inspiron सीरिजमधील चार नवीन लॅपटॉप्स भारतात लाँच; इथे बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 6:01 PM

Dell Inspiron India: Dell ने Inspiron 14 2-in-1, Dell Inspiron 14, Dell Inspiron 15 आणि Dell Inspiron 13 असे चार लॅपटॉप भारतात लाँच केले आहेत.

Dell ने आपल्या Inspiron सीरिजमध्ये चार नवीन लॅपटॉप भारतात लाँच केले आहेत. यात Inspiron 14 2-in-1, Dell Inspiron 14, Dell Inspiron 15 आणि Dell Inspiron 13 चा समावेश आहे. या नवीन Dell लॅपटॉप्समधील बेजल्सचा आकार कमी करण्यात आला आहे. तसेच टचपॅडचा आकार वाढवण्यात आला आहे. Dell Inspiron सीरीजच्या लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट रीडर देखील देण्यात आला आहे. सर्व लॅपटॉप्समध्ये HD Webcam आणि Express Charge सपोर्ट देण्यात आला आहे.  

Dell Inspiron सीरीजच्या लॅपटॉपची किंमत 

  • Dell Inspiron 14 2-in-1 ची किंमत 57,990 रुपयांपासून सुरु होते. (खरेदीसाठी उपलब्ध) 
  • Dell Inspiron 14 ची किंमत 44,990 रुपयांपासून सुरु होते. (आजपासून उपलब्ध होईल)  
  • Dell Inspiron 15 (Intel) ची किंमत 48,990 रुपयांपासून सुरु होते. (22 जूनपासून उपलब्ध)  
  • Dell Inspiron 15 (AMD) ची किंमत 57,990 रुपयांपासून सुरु होते. (22 जूनपासून उपलब्ध)  
  • Dell Inspiron 13 ची किंमत 68,990 रुपयांपासून सुरु होते. (7 जुलैपासून उपलब्ध)  

नवीन डेल इंस्पिरॉन रेंज Dell वेबसाइट आणि अमेझॉनसह निवडक स्टोर्सवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

Dell Inspiron 14 2-in-1 चे स्पेसिफिकेशन्स  

नवीन डेल इंस्पिरॉन 14 2-in-1 ला युजर्स लॅपटॉप, टेंट, स्टॅन्ड आणि टॅबलेट अश्या विविध मोडमध्ये वापरू शकतील. हा intel आणि AMD कॉन्फिगरेशनसह आला आहे. दोन्ही व्हेरिएंट्समध्ये 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 14 इंचाचा फुल HD टच डिस्प्ले देण्यात आला आहे. intel व्हेरिएंट 11th-Gen Intel Core i7 प्रोसेसर आणि 2GB GDDR5 ग्राफिक मेमरी कार्डसह येतो. तर, AMD व्हेरिएंटमध्ये Ryzen 7 5700U CPU आणि Radeon ग्राफिक्स आहेत. Dell Inspiron 14 2-in-1 मध्ये 16GB पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये HDMI पोर्ट, दोन USB 3.2 Gen 1 Type-A पोर्ट्स, USB 3.2 Gen 1 Type-C पोर्ट, Wi-Fi 6, Bluetooth v5 आणि 3.5mm का हेडफोन जॅक देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 54Whr ची बॅटरी आहे.  

Dell Inspiron 14 आणि Dell Inspiron 15 चे स्पेसिफिकेशन्स  

Dell Inspiron 14 मध्ये 1,920×1,080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 14 इंचाचा Full-HD डिस्प्ले आणि 11th-Generation Intel Core i7 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, Dell Inspiron 15 लॅपटॉपमध्ये 1,920×1,080 पिक्स्ल वाले 15.6 इंचाचा Full-HD डिस्प्ले आहे. लॅपटॉप्समध्ये 16GB पर्यंतचा DDR4 रॅम आणि स्टोरेजसाठी 1TB पर्यंतची M.2 PCIe NVMe SSD आहे. Inspiron 14 आणि Inspiron 15 लॅपटॉपमध्ये HDMI पोर्ट, Thunderbolt 4 पोर्ट, USB Type-C 3.2 Gen2 पोर्ट, दोन USB Type-A 3.2 Gen1 पोर्ट्स, हेडफोन जॅक आणि Wi-Fi 6 देण्यात आला आहे. दोन्ही लॅपटॉप्समध्ये 54Whr ची बॅटरी आहे. 

Dell Inspiron 13 चे स्पेसिफिकेशन्स  

Dell Inspiron 13 मध्ये 2,560×1,600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 13.3 इंचाचा QHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 11th-Generation Intel Core i7-11370H CPU आणि 2GB GDDR6 ग्राफिक्स मेमरी कार्डला सपोर्ट करतो. Inspiron 13 मध्ये 16GB पर्यंतचा LPDDR34x रॅम आणि 512GB NVMe SSD आहे. कनेक्टिविटीसाठी या लॅपटॉपमध्ये HDMI पोर्ट, USB Type-A 3.2 Gen 1 पोर्ट, दोन Thunderbolt 4 पोर्ट्स आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. यात Wi-Fi 6 आणि Bluetooth v5.1 आहे. यात देखील 54Whr ची बॅटरी आहे.

टॅग्स :dellडेलtechnologyतंत्रज्ञानlaptopलॅपटॉप