शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

गॅलेक्सी टॅब एस ४ लवकरच बाजारपेठेत होणार दाखल

By शेखर पाटील | Updated: May 9, 2018 16:59 IST

या मोबाईलचा मुख्य व फ्रंट कॅमेरा अनुक्रमे १२ व ८ मेगापिक्सल्सचा असण्याची शक्यता आहे.

मुंबई: सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस ४ हा नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत उतारणार असून विविध लीक्सच्या माध्यमातून याची माहिती समोर आली आहे.

स्मार्टफोन उत्पादनात आयफोनच्या आव्हानाला पुरून उरत सॅमसंग कंपनीने जागतिक पातळीवर आपला दबदबा कायम राखला आहे. यासोबत टॅबलेटच्या क्षेत्रात आयपॅडला टक्कर देण्यासाठीही या कंपनीला सातत्याने कसरत करावी लागत आहे. या अनुषंगाने लवकरच सॅमसंग कंपनी गॅलेक्सी टॅब एस ४ या नावाने नवीन मॉडेल सादर करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरं तर, या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्येच या मॉडेलचे अनावरण होणार असल्याचे संकेत मिळाले होते. तथापि, याऐवजी आता हा टॅबलेट बर्लीन शहरात होणार्‍या ‘आयएफए-२०१८’ या फेस्टमध्ये सादर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच वाय-फाय अलायन्सच्या संकेतस्थळावर या मॉडेलचे रजीस्ट्रेशन करण्यात आले असून याच्या माध्यमातून याचे सर्व फिचर्स जगासमोर आले आहेत. 

या लिस्टींगचा विचार केला असता, सॅमसंगच्या गॅलेक्सी टॅब एस ४ या मॉडेलचे वाय-फाय आणि एलटीई असे दोन व्हेरियंट असतील. अर्थात यातील एका मॉडेलमध्ये फक्त वाय-फाय कनेक्टीव्हिटी असून दुसऱ्यात यासोबत सीमकार्ड वापरण्याची सुविधा दिलेली असेल. यात १०.५ इंच आकारमानाचा आणि २५६० बाय १६०० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ हा प्रोसेसर दिलेला असेल. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. तसेच यातील मुख्य व फ्रंट कॅमेरा अनुक्रमे १२ व ८ मेगापिक्सल्सचा असण्याची शक्यता आहे. हा टॅबलेट अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारा असल्याचे या लिस्टींगमध्ये नमूद करण्यात आले आहे. यात एक्सटर्नल कि-बोर्ड वापरता येणार असून यासोबत स्टायलस पेनचा सपोर्टदेखील असेल. या मॉडेलचे अन्य फिचर्स आणि मूल्याबाबत मात्र यामध्ये काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल