शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन फोन कव्हर घेताय? थांबा! फक्त लुक्स पाहून फसू नका; 'या' ३ गोष्टींकडे लक्ष द्या अन्यथा बिघडू शकतो फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:06 IST

फोन कव्हर निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टी पाहाव्यात, याच्या काही खास टिप्स तुमच्यासाठी...

नवा कोरा स्मार्टफोन घेतला की आपण सर्वात आधी काय करतो? तर त्याला सुरक्षेसाठी एक छानसं बॅक कव्हर लावतो. फोन स्वस्त असो वा महाग, तो हातातून निसटून फुटू नये किंवा त्याला ओरखडे पडू नयेत, यासाठी कव्हर अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, आजकाल बाजारात आकर्षक डिझाईन्स आणि रंगांचे कव्हर उपलब्ध असल्याने अनेकजण केवळ लुक्स पाहून कव्हर खरेदी करतात. पण सावधान! फक्त शोभेसाठी घेतलेलं कव्हर तुमच्या फोनचे आयुष्य कमी करू शकतं. फोन कव्हर निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टी पाहाव्यात, याच्या काही खास टिप्स तुमच्यासाठी...

फिटिंग सर्वात महत्त्वाची 

कव्हर दिसायला कितीही सुंदर असले तरी त्याची फिटिंग परफेक्ट असणे गरजेचे आहे. कव्हर लावल्यानंतर फोनचे बटन्स व्यवस्थित प्रेस होत आहेत का, हे तपासून पहा. अनेकदा चुकीच्या फिटिंगमुळे चार्जिंग पोर्ट किंवा हेडफोन जॅक झाकला जातो, ज्यामुळे वारंवार कव्हर काढावे लागते. तसेच, फोनचा सेन्सर किंवा कॅमेरा लेन्स कव्हरमुळे झाकली जात नाहीये ना, याची खात्री करून घ्या.

जाडीचा विचार करा, अन्यथा फोन तापेल!

अनेकजण सुरक्षेच्या नावाखाली खूप जाड कव्हर घेतात. मात्र, अशा जाड कव्हरमुळे फोनमधील उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. जर तुम्ही फोनवर गेमिंग करत असाल किंवा व्हिडिओ एडिटिंगसारखी कामे करत असाल, तर जाड कव्हरमुळे फोन ओव्हरहीट होऊ शकतो. ही उष्णता आतच अडकून राहिल्याने फोनच्या प्रोसेसरवर आणि बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो मध्यम जाडीचे आणि व्हेंटिलेशन देणारे कव्हर निवडा.

मटेरियलकडे लक्ष द्या

कव्हर कोणत्या मटेरियलपासून बनले आहे, हे खूप महत्त्वाचे आहे.

प्लास्टिक कव्हर: हे दिसायला छान असतात पण फोन पडल्यावर ते स्वतःच तडकतात आणि फोनला नीट संरक्षण देत नाहीत.

सिलिकॉन कव्हर: हे मऊ असतात, पण त्यावर धूळ लवकर चिटकते आणि काही दिवसांनी ते पिवळे पडतात.

रबर किंवा टीपीयू: चांगल्या दर्जाच्या रबरपासून बनवलेले कव्हर सर्वोत्तम मानले जातात. हे लवचिक असतात, ज्यामुळे ते काढणे सोपे जाते आणि फोनच्या कोपऱ्यांना उत्तम संरक्षण देतात.

स्क्रीन प्रोटेक्शन 

कव्हर असे निवडा ज्याच्या कडा स्क्रीनच्या थोड्या वर असतील. यामुळे फोन जर पालथा पडला, तर स्क्रीन थेट जमिनीला न लागता कव्हरच्या कडांवर आदळेल आणि स्क्रीन फुटण्याचा धोका कमी होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't Just Buy a Phone Cover for Looks: Consider These!

Web Summary : Phone covers protect, but the wrong one can damage your device. Prioritize fit, material (rubber/TPU is best), and heat ventilation. Ensure the cover's edges offer screen protection to prevent cracks.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान