नेटफ्लिक्ससाठी केलं ४९९ रुपयांचं पेमेंट, बसला १.२२ लाखांचा फटका; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 20:10 IST2022-12-02T19:56:47+5:302022-12-02T20:10:31+5:30
सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. आजच्या काळात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. पण, यात फसवणूकीचे प्रमाणही वाढले आहे.

नेटफ्लिक्ससाठी केलं ४९९ रुपयांचं पेमेंट, बसला १.२२ लाखांचा फटका; नेमकं प्रकरण काय?
सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. आजच्या काळात डिजिटल पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. पण, यात फसवणूकीचे प्रमाणही वाढले आहे. कधी वीजबिलाच्या नावाखाली, तर कधी अन्य मार्गाने फसवणूक करणारे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करतात. असाच काहीसा प्रकार मुंबईतील एका ७४ वर्षीय व्यावसायिकासोबत घडला.
गुन्हेगारांनी जुहू येथील पीडित व्यावसायिकाची ऑनलाइन 1.22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन करण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीला फसवले आहे. स्कॅमर्सनी व्यावसायिकाला नेटफ्लिक्सच्या संदर्भात माहिती मेलद्वारे दिली. 499 रुपयांच्या रिचार्जमुळे त्या व्यक्तीचे 1.22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
Facebook, Twitter नंतर आता ShareChat मध्येही कर्मचाऱ्यांना दिला नारळ
एका व्यावसायिकाला एक मेल आला होता, ज्यामध्ये नेटफ्लिक्सचे रिचार्ज करण्यात आल्याचे सांगितले होते. यावेळी त्या व्यक्तीला वाटले की हा मेल नेटफ्लिक्सवरून आला आहे. यामध्ये युजरला 499 रुपये भरून नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन सुरू ठेवण्यास सांगण्यात आले होते.
हा मेल अधिकृत मेलसारखा दिसत होता त्यामुळे त्या व्यक्तीला कंपनीकडून आला असल्याचे वाटले. मेलमध्ये ऑनलाइन पेमेंटची लिंकही देण्यात आली होती. व्यावसायिकाने काहीही विचार न करता या लिंकवर क्लिक केले आणि त्यात त्याचे क्रेडिट कार्डचे डिटेल्स भरले.
यानंतर त्या व्यक्तीने काहीही विचार न करता OTP शेअर केला, यानंतर त्यांच्या खात्यातून 1.22 लाख रुपये कट झाले. याबाबत त्यांना बँकेतून फोन आला, यानंतर या प्रकरणाची माहिती मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 'फसवणूक करणाऱ्यांनी पाठवलेल्या मेलमध्ये 499 रुपये भरल्याची लिंकही होती. पीडितेने कोणताही विचार न करता या लिंकवर क्लिक केले आणि त्याच्या क्रेडिट कार्डचे तपशील टाकले. यानंतर त्यांच्या फोनवर 1.22 लाख भरण्यासाठी ओटीपी आला.