BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग
By देवेश फडके | Updated: January 16, 2021 17:00 IST2021-01-16T16:58:14+5:302021-01-16T17:00:14+5:30
वास्तविक पाहता व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचेही ५९९ रुपयांचे प्लान आहेत. मात्र, तरीही BSNL चा प्लान वेगळा ठरत आहे.

BSNL ची भन्नाट ऑफर! ५९९ रुपयांत मिळवा प्रतिदिन ५ जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग
नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने ग्राहकांसाठी अगदी हटके प्लान आणला आहे. ५९९ रुपयांच्या रिचार्जवर 'बीएसएनएल'कडून उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. वास्तविक पाहता व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या कंपन्यांचेही ५९९ रुपयांचे प्लान आहेत. मात्र, तरीही BSNL चा प्लान वेगळा ठरत आहे.
BSNL च्या ५९९ रुपये किमतीचा प्लान 2G, 3G आणि 4G यापैकी कोणत्याही नेटवर्कवर वापरला जाऊ शकतो. या प्लानमध्ये युझर्संना प्रतिदिन ५ जीबी डेटा दिला जातो. एकूण ८४ दिवस वैधता असलेल्या प्लॅनमध्ये ग्राहकाला तब्बल ४२० जीबी डेटा वापरायला मिळतो. याशिवाय अनलिमिटेड व्हॉइस कॉल, प्रतिदिन १०० एसएमएस अशा अन्य काही सुविधा BSNL कडून देण्यात येतात.
Jio चाही ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान ऑफर केला जातो. मात्र, त्यात केवळ २ जीबी डेटा दिला जातो. Vi च्या ५९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये १.५ जीबी डेटा दिला जातो. तर, Airtel कडून ५९८ रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये १.५ जीबी डेटा दिला जातो. सदर कंपन्यांच्या या प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे.
प्रीपेड रिचार्ज प्लानचा एकूण आढावा घेतल्यास ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये BSNL बाजी मारत असून, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ कंपन्यांच्या तुलनेत BSNL ग्राहकांना प्रतिदिन तब्बल ५ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच सर्व नेटवर्कवर ही सुविधा BSNL कडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.