ANC फिचर असलेले सर्वात स्वस्त इयरबड्स लाँच; इतकी आहे boAt Airdopes 411 ANC ची किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: March 22, 2022 07:33 PM2022-03-22T19:33:51+5:302022-03-22T19:34:08+5:30

boAt Airdopes 411 ANC भारतात लाँच करण्यात आले आहेत. यात कमी किंमतीत ANC फिचर देण्यात आलं आहे.  

Boat Airdopes 411 ANC Launched In India With Bluetooth 5 2  | ANC फिचर असलेले सर्वात स्वस्त इयरबड्स लाँच; इतकी आहे boAt Airdopes 411 ANC ची किंमत 

ANC फिचर असलेले सर्वात स्वस्त इयरबड्स लाँच; इतकी आहे boAt Airdopes 411 ANC ची किंमत 

googlenewsNext

boAt Airdopes 411 ANC इयरबड्स भारतात लाँच झाले आहेत. यांची खासियत म्हणजे यात कमी किंमतीत Active Noise Cancellation फिचर देण्यात आलं आहे. परंतु कंपनी इथंवर थांबली नाही, सोबत 10mm चे ड्रायव्हर, 320mAh ची बॅटरी आणि IPX4 रेटिंग देखील देण्यात आली आहे. या फिचर संपन्न इयरबड्सची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  

हे इयरबड्स आजपासून कंपनीच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येतील. सोबत एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जात आहे. या इयरबड्सचे Black Storm, Blue Thunder आणि Grey Hurricane कलर ऑप्शन बाजारात उपलब्ध झाले आहेत. ZestMoney वरून यांची खरेदी 666 रुपये दरमहा देऊन देखील करता येईल.  

boAt Airdopes 411 ANC चे स्पेसिफिकेशन्स 

boAt Airdopes 411 ANC मध्ये 10mm चे ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. या इयरबड्समधील 320mAh ची बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फक्त 10 मिनिटांच्या चार्जवर 60 मिनिटांचा प्ले बॅक टाइम मिळतो. पावर जास्त वापरणारं ANC फिचर चालू असेल तर हे इयरबड्स 4.5-तास वापरता येतात. यात IPX4 वॉटर रेजिस्टन्स रेटिंग देण्यात आली आहे. 

यात कनेक्टिविटीसाठी Bluetooth v5.2 देण्यात आलं आहे. यातील IWP (Insta Wake-N-Pair) सहज स्मार्टफोनशी कनेक्ट करण्यास मदत करते. ANC फिचर 25dB पर्यंत नॉइज कॅन्सलेशन देतं. यात कॉल, म्यूजिक आणि वॉयस असिस्टंटसाठी टच कंट्रोल्स देण्यात आले आहेत.  

Web Title: Boat Airdopes 411 ANC Launched In India With Bluetooth 5 2 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.